कोरोनामुळे दहावी- बारावीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:05 AM2021-03-18T04:05:06+5:302021-03-18T04:05:06+5:30
बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप ! -- बोर्ड परीक्षा : विभागात गेल्यावर्षीपेक्षा ३८ हजारांनी घटली विद्यार्थीसंख्या, ३ लाख ३५ हजार ...
बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप !
--
बोर्ड परीक्षा : विभागात गेल्यावर्षीपेक्षा ३८ हजारांनी घटली विद्यार्थीसंख्या, ३ लाख ३५ हजार ४५८ परीक्षार्थी
---
औरंगाबाद : दहावी- बारावीच्या परीक्षा काॅपीमुक्तीपेक्षा कोरोनामुक्त घेण्याचे आव्हान माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळासमोर आहे. विभागातील पाच जिल्ह्यांतून ३ लाख ३५ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरले. ही संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत ३८ हजारांनी कमी आहे, तर विभागात सर्वाधिक विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातील असून बहुसंख्य विद्यार्थ्यांनी गॅप घेतल्यामुळे यंदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे दिसते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे यावर्षी कोरोनामुळे एप्रिल-मे महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. ऑफलाईन परीक्षेत फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के, तर रिपीटर विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाणार आहे. विभागीय मंडळांकडून १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच तयार करून ते राज्य मंडळाकडे सोपविण्यात आले असून प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
---
विभागातील बोर्ड परीक्षेसाठी अर्ज
--
जिल्हा - दहावीचे विद्यार्थी - बारावीचे विद्यार्थी
--
औरंगाबाद- ६५,०११ - ५५,१७७
बीड - ४२,५८८- ३६,२६७
जालना - ३१,२९६- २८,२७७
परभणी - २८,४४०- २०,५५२
हिंगोली - १६२७६- ११,५८०
---
दहावीचे परीक्षार्थी
--
२०२० - २ लाख १ हजार ५७२
२०२१ - १ लाख ८३ हजार ६११
दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे
---
बारावीचे परीक्षार्थी
---
२०२०- १ लाख ७१ हजार ९५९
२०२१ - १ लाख ५१ हजार ८४७
बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे
---
दहावी बारावीचे एकूण परीक्षार्थी
--
२०२०- ३ लाख ७३ हजार ५३१
२०२१ - ३ लाख ३५ हजार ४५८
---
पुनर्परीक्षार्थी १४ हजार ४५२
---
बारावीचे पुनर्परीक्षार्थी ७ हजार ३४, तर दहावीचे ७ हजार ४१८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. ही संख्या मागील वर्षापेक्षा कमी असून त्यांना १०० टक्के अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका राहील, असे विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
बारावीच्या परीक्षार्थींची संख्या दहावीपेक्षा कमी असली तरी नव्याने परीक्षा देवून चांगले मार्क घेण्याच्या प्रयत्नातील विद्यार्थ्यांची यात अडचण झाली आहे. वर्षभरातील काही दिवस वगळता कोचिंग क्लासेस बंद होते. त्यामुळे स्वाध्याय आणि ऑनलाईवर भर द्यावा लागला.