कोरोना पुन्हा वाढतोय; अहमदनगरच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 01:25 PM2021-10-05T13:25:14+5:302021-10-05T13:27:19+5:30
Corona Virus in Aurangabad : शाळा सुरू झाल्या असून, सर्व काही आलबेल असल्यासारखे वाटत असतानाच शेजारच्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे.
औरंगाबाद : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे ( Corona Virus ) रुग्ण वाढू लागल्यामुळे ६१ गावांत १३ ऑक्टोबरपर्यंत लाॅकडाऊन ( Lockdown in villages from Ahamednagar ) करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी पत्र देऊन चेकपोस्टवरील सुरक्षा वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत.
शाळा सुरू झाल्या असून, सर्व काही आलबेल असल्यासारखे वाटत असतानाच शेजारच्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. अहमदनगरकडून जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांच्या चेकपोस्टवर येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात येण्यापासून कुणाला रोखण्यात येणार नाही, परंतु चेकपोस्टवर प्रवाशांना लसीकरण केल्याबाबत विचारणा करण्यात येईल. तसेच काही आजार आहे की, याची माहिती घेण्यात येईल. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या १५३ कोरोनाचे रुग्ण आहेत. मृत्यदर देखील मोठ्या प्रमाणात घटला आहे. परिस्थिती अशीच नियंत्रणात राहावी, यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व प्रशासकीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतीत तोटा झाल्याने देशी जुगाड केला, शुद्ध हळद डोळ्यांसमोर दळून देत पैसा कमावला
जिल्हाधिकारी चव्हाण यांचे मत
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, शहर व ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे प्रशासनासह पोलीस प्रशासनाला आज सायंकाळी पत्र देऊन चेकपोस्टवर तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहमदनगरमधून औरंगाबादकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे.
सिल्लोडमध्ये अतिक्रमण काढण्यावरून काही काळ तणाव; विरोध करणारे भाजप पदाधिकारी अटकेत