कोरोना कहर ! औरंगाबादेत एक आणि सहा महिने वयांच्या दोन शिशुंचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 10:40 AM2021-03-30T10:40:43+5:302021-03-30T10:42:24+5:30
Corona in Aurangabad : औरंगाबादेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने 31 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून, घाटी रुग्णलयात अवघ्या एक महिने वयाच्या कोरोनाग्रस्त मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याबरोबरच ६ महिने वयाच्या कोरोनाग्रस्त मुलीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.
एक महिन्याचे बाळ २८ मार्च रोजी अति गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णाच्या पालकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून त्याचे वडील कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. सदर रुग्ण कन्नड (औरंगाबाद )येथील रहिवासी आहे. मृत्युचे कारण कॉम्प्लेक्स कंजेनायटल हार्ट डिसीज, कार्डिओजेनिक शॉक,डिस्सेमिनेटेड इन्ट्राव्हॅस्क्युलर कोअॅग्युलेशन, पल्मनरी हिमरेज, कोविड १९ असे आहे.
त्याबरोबरच ६ महिने वयाच्या कोरोनाग्रस्त मुलीला २७ मार्च रोजी गंभीर अवस्थेत दाखल दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती तिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सदर रुग्ण ब्रिजवाडी, औरंगाबाद येथील रहिवासी आहे. त्याच्या मृत्युचे कारण सिव्हिअर ब्रॉन्कोन्यूमोनिया विद ॲक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, सेप्टीक शाॅक, डिस्सेमिनेटेड इन्ट्राव्हॅस्क्युलर कोअॅग्युलेशन, कोविड १९ असे आहे.