जिल्हा बँकेला कोरोनामुळे वसुलीला बसला जबरदस्त फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:05 AM2021-05-25T04:05:31+5:302021-05-25T04:05:31+5:30
जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांची बैठकीस उपस्थिती होती. कोरोनामुळे शेतकरी बेजार झाले आहेत. सध्या खरीप हंगाम तोंडावर आला आहे. ...
जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांची बैठकीस उपस्थिती होती.
कोरोनामुळे शेतकरी बेजार झाले आहेत. सध्या खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे या परिस्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित म्हणजे तीन दिवसांत कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मुंबई येथील कार्यालयातून ते या बैठकीस ऑनलाईन उपस्थित होते.
सध्या सर्वत्र कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. शेतकरीही त्यातून सुटला नाही. त्यातच खरिपाचा हंगाम समोर येऊन ठेपला आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा बँकेने त्वरित कर्ज वितरित केले पाहिजे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तीन दिवसात नवीन कर्ज उपलब्ध करून शेतकऱ्यांना या बिकट परिस्थितीत दिलासा देण्याची अपेक्षा सत्तार यांनी व्यक्त केली. बैठकीस जगन्नाथ काळे, किरण पाटील डोणगावकर, देवयानी डोणगावकर, कृष्णा पाटील डोणगावकर, जावेद पटेल आदींसह संचालक उपस्थित होते. बैठकीस ज्येष्ठ संचालक व रोहयो मंत्री संदीपान भुमरे, संचालक व आ. अंबादास दानवे, आ. सतीश चव्हाण, उपाध्यक्ष गाढे पाटील आदी अनुपस्थित होते.