पिशोरमध्ये दहा व्यापाऱ्यांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:04 AM2021-04-15T04:04:47+5:302021-04-15T04:04:47+5:30

प्रशासनाच्या निर्देशानुसार येथील ग्रामपंचायत प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांना दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करून तपासणीचे प्रमाणपत्र बाळगण्याचे ...

Corona hits ten traders in Peshawar | पिशोरमध्ये दहा व्यापाऱ्यांना कोरोनाची बाधा

पिशोरमध्ये दहा व्यापाऱ्यांना कोरोनाची बाधा

googlenewsNext

प्रशासनाच्या निर्देशानुसार येथील ग्रामपंचायत प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांना दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करून तपासणीचे प्रमाणपत्र बाळगण्याचे आवाहन केले होते. या अनुषंगाने येथील स्थानिक व्यापाऱ्यांचे ग्रामीण रुग्णालयात विविध टप्प्यांत स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले होते. दरम्यान, रविवारी तीन व बुधवारी सात, असे एकूण दहा व्यापाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पसरल्याचे दिसून आले. अद्याप भाजीपाला व फळे विक्रेते यांच्या चाचण्या बाकी असल्याने ही संख्या वाढण्याची भीती आहे. अनेक नागरिक सर्रास विनामास्क व गर्दीच्या ठिकाणी विनाकारण वावरत असल्याने परिस्थिती बिघडत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना चाचण्या बंधनकारक करणाऱ्या प्रशासनाने मात्र बाहेरून येणारे व्यापारी, फेरीवाले व विक्रेत्यांकडे मात्र साफ दुर्लक्ष केले असल्याने अशा व्यापारी व विक्रेत्यांवरसुद्धा कारवाई करावी अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे. शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर रोगप्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सपोनि. हरीशकुमार बोराडे यांनी दिला आहे.

Web Title: Corona hits ten traders in Peshawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.