औरंगाबादेत २९ दिवसांच्या मुलाचा, ६ महिन्यांच्या मुलीचा आणि १४ वर्षांच्या मुलाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:02 AM2021-03-31T04:02:06+5:302021-03-31T04:02:06+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना अवघ्या २९ दिवसांच्या कोरोनाग्रस्त मुलाचा ...

Corona kills 29-day-old boy, 6-month-old girl and 14-year-old boy in Aurangabad | औरंगाबादेत २९ दिवसांच्या मुलाचा, ६ महिन्यांच्या मुलीचा आणि १४ वर्षांच्या मुलाचा कोरोनाने मृत्यू

औरंगाबादेत २९ दिवसांच्या मुलाचा, ६ महिन्यांच्या मुलीचा आणि १४ वर्षांच्या मुलाचा कोरोनाने मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना अवघ्या २९ दिवसांच्या कोरोनाग्रस्त मुलाचा आणि ६ महिन्यांच्या मुलीचा २९ मार्च रोजी मृत्यू झाला. हे दोन्ही शिशू कन्नड येथील रहिवासी आहेत. यासह एका १४ वर्षीय मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. आतापर्यंत केवळ ज्येष्ठांना धोका असल्याचे सांगितले जात होते. परंतु या तिघांच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

२९ दिवसांचा मुलगा २८ मार्च रोजी अतिगंभीर अवस्थेत दाखल झाला होता आणि त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णाच्या पालकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून, त्याचे वडील कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. या शिशूला हार्ट डिसिस होता. मृत्यूचे कारण कॉम्प्लेक्स कंजेनायटल हार्ट डिसिस, कार्डिओजेनिक शॉक, डिस्सेमिनेटेड इन्ट्राव्हॅस्क्युलर कोअ‍ॅग्युलेशन, पल्मनरी हिमरेज, कोविड-१९ असे आहे.

त्याबरोबरच ६ महिने वयाच्या कोरोनाग्रस्त मुलीला २७ मार्च रोजी गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मृत्यूचे कारण सिव्हिअर ब्रॉन्कोन्यूमोनिया विथ ॲक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, सेप्टीक शाॅक, डिस्सेमिनेटेड इन्ट्राव्हॅस्क्युलर कोअ‍ॅग्युलेशन, कोविड-१९ असे आहे.

तसेच औरंगाबादेतील ज्युबिली पार्क येथील १४ वर्षांच्या मुलाला २३ मार्च रोजी भरती करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यानेही सोमवारी अखेरचा श्वास घेतला.

चौकट...

यापूर्वी १० दिवसांच्या शिशूचा मृत्यू

घाटीत गतवर्षी ७ सप्टेंबर २०२० रोजी नांदेडवरून रेफर झालेल्या १० दिवसांच्या शिशूचा मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर बालकांच्या मृत्यूचे प्रमाण नव्हते. हे शिशू नांदेड जिल्ह्यातील होते. कन्नड येथील २९ दिवसांचा मुलगा हा औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत कमी वयाचा कोरोना मृत्यू ठरला आहे.

कोट...

गंभीर अवस्थेत दाखल

लहान मुलांत सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसून येत होती. पण, गेल्या काही दिवसांत ३ ते ४ बालके गंभीर अवस्थेत दाखल झाली. २९ दिवसांचे आणि ६ महिन्यांचे शिशू दाखल होतानाच त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांना आई-वडिलांकडून संसर्ग झाल्याची शक्यता असू शकते.

-डाॅ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख, घाटी

Web Title: Corona kills 29-day-old boy, 6-month-old girl and 14-year-old boy in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.