औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्येत घोळ; अगोदर म्हणाले फक्त 3 नंतर सांगितले ५४ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 01:02 PM2020-11-04T13:02:15+5:302020-11-04T13:05:19+5:30

जिल्ह्यात आढळलेल्या नव्या ५४ रुग्णांत ग्रामीण भागातील १७, मनपा हद्दीतील ७ आणि अन्य ३० रुग्णांचा समावेश आहे.

Corona patients in Aurangabad; Previously said only 3 then said 54 patients increase | औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्येत घोळ; अगोदर म्हणाले फक्त 3 नंतर सांगितले ५४ रुग्णांची वाढ

औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्येत घोळ; अगोदर म्हणाले फक्त 3 नंतर सांगितले ५४ रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देमोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ३० ग्रामीण भागात ६ रुग्ण  आढळलेले आहेत. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येतील घोळ मंगळवारी समोर आला. जिल्हातील एकूण रुग्णसंख्या किती, किती रुग्ण बरे होऊन घरी गेले आणि किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत, याचा ताळमेळच लागला नाही. त्यामुळे केवळ ५४ नव्या रुग्णांची वाढ झाली, एवढीच माहिती जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा दिली. 

जिल्ह्यात आढळलेल्या नव्या ५४ रुग्णांत ग्रामीण भागातील १७, मनपा हद्दीतील ७ आणि अन्य ३० रुग्णांचा समावेश आहे. अँटिजन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ३० आणि ग्रामीण भागात ६ रुग्ण  आढळलेले आहेत. 

रुग्णसंख्या लपविण्याचा प्रयत्न?
जिल्ह्यात २७१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सोमवारी माहिती कार्यालयातर्फे सांगण्यात आले. मात्र, जिल्ह्यात मंगळवारी ३२४ रुग्णांना सुटी देण्यात आल्याची माहिती आधी देण्यात आली. धक्कादायक म्हणजे एकट्या घाटीत १०४ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असताना आणि नव्याने ५४ रुग्णांची वाढ झालेली असताना केवळ ३ रुग्णांवरच उपचार सुरू असल्याचे दाखविण्यात आले. हा प्रकार निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत रुग्णसंख्या नेमकी किती, याचा हिशेब सुरू होता. हा हिशेब लागत नसल्याने अखेर ५४ नव्या रुग्णांची वाढ इतकीच माहिती जिल्हा प्रशासनाने सुधारित म्हणून प्रसिद्धीसाठी दिली. 

ग्रामीण भागातील रुग्ण-१७
गंगापूर ५, कासोद, सिल्लोड १, बजाजनगर २, फुलंब्री १, वीरगाव, वैजापूर १, उक्कडगाव, वैजापूर १, फुलेवाडी रोड, वैजापूर १, वैजापूर १, श्रीकृष्णनगर, देवळाई १, औरंगाबाद १, सिल्लोड १, पिंपळगाव १. 

मनपा हद्दीतील रुग्ण-७
निरंजन हौसिंग सोसायटी, टिळकनगर १, एन-९, श्रीकृष्णनगर, सिडको १, एन-२, सिडको १, एन-९, शिवाजीनगर १, जाधववाडी १, बजाज हॉस्पिटल परिसर १, गुलमंडी १.

Web Title: Corona patients in Aurangabad; Previously said only 3 then said 54 patients increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.