औरंगाबादेत कोरोनाची उच्चांकी वाढ सुरूच, एकाच दिवसात १,२७१ नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 12:04 PM2021-03-17T12:04:10+5:302021-03-17T12:06:07+5:30

Corona patients continues to rise in Aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ६०,१०० झाली आहे, तर आतापर्यंत ५२,०७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

Corona patients continues to rise in Aurangabad, adding 1,271 new patients in a single day | औरंगाबादेत कोरोनाची उच्चांकी वाढ सुरूच, एकाच दिवसात १,२७१ नव्या रुग्णांची भर

औरंगाबादेत कोरोनाची उच्चांकी वाढ सुरूच, एकाच दिवसात १,२७१ नव्या रुग्णांची भर

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातच एक हजारांवर रुग्णसध्या ६,६७६ रुग्णांवर सुरू उपचारउपचारादरम्यान ८ रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची उच्चांकी वाढ सुरूच असून, मंगळवारी दिवसभरात तब्बल १,२७१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात एकट्या औरंगाबाद शहरातीलच १,०११ रुग्णांचा समावेश आहे, तसेच ३८४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. उपचार सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील ७ आणि अन्य जिल्ह्यांतील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ६,६७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ६०,१०० झाली आहे, तर आतापर्यंत ५२,०७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,३५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ३२४ आणि ग्रामीण भागातील ६०, अशा एकूण ३८४ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. ग्रामीण भागात २३९ नव्या रुग्णांची वाढ झाली, तर अँटिजन टेस्टद्वारे २१ जण कोरोनाबाधित आढळले. हे २१ रुग्ण कोणत्या भागातील आहेत, याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नाही. उपचार सुरू असताना वाळूज, बजाजनगरातील ५५ वर्षीय पुरुष, बाबरा-फुलंब्रीतील ९५ वर्षीय महिला, खडकेश्वर येथील ८१ वर्षीय पुरुष, जैतापूर येथील ६१ वर्षीय पुरुष, शिक्षक काॅलनी-सिल्लोड येथील ७२ वर्षीय महिला, श्रीकृष्णनगर, हडकोतील ६८ वर्षीय पुरुष, काजीवाडा-भडकलगेट येथील ६३ वर्षीय पुरुष आणि भोकरदन-जालना येथी ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी परिसर ६, जिजामाता कॉलनी १, सातारा परिसर २३, एकनाथनगर ३, नागेश्वरवाडी ३, उल्कानगरी ९, गारखेडा २५, हडको २, सिडको छत्रपतीनगर २, काझीपुरा १, पडेगाव ५, शासकीय वैद्यकीय मुलांचे वसतिगृह २, खडकेश्वर ४, बिसमिल्ला कॉलनी १, सिडको एन-८ येथे ८, वेदांतनगर ७, एन-२, सिडको १०, गादिया विहार ६, रशिदपुरा १, एन-११ येथे ९, बोहरी कट्टा २, राजनगर २, कोंकणवाडी ३, तापडिया प्राइड पैठण रोड २, दशमेशनगर १, बन्सीलालनगर ४, पद्मपुरा ७, जालाननगर ५, अजबनगर २, माळीवाडा १, प्रतापनगर ५, कैलासनगर ६, गजानननगर ४, सादतनगर १, श्रीकृष्णनगर ३, उस्मानपुरा १३, एन-३, सिडको १२, रोझा बाग १, तुषारनगर १, म्हाडा कॉलनी ५, एन-४, सिडको १३ , पद्मपाणी कॉलनी एमआयडीसी १, विनायकनगर १, कासलीवाल मार्वल ४, पीर बाजार १, नंदादीप कॉलनी १, नक्षत्रवाडी ३, सारा सिटी १, एन-९ येथे ५, देवळाई परिसर ४, दशमेशनगर १, कलेक्टर ऑफिस १, स्पोर्टस् ॲथॉरिटी ऑफ इंडिया १, ग्रॅण्ड कैलास हॉटेल १, कांचनवाडी ३, अंबिकानगर १, टाऊन हॉल १, मुकुंदवाडी ६, कामगार चौकी १, ठाकरेनगर ३, मोतीनगर २, टाऊन सेंटर १, जय भवानीनगर ६, चिकलठाणा ८, संघर्षनगर १, विश्रांतीनगर २, एसबीआय मुख्य कार्यालय १, विठ्ठलनगर २, सुंदरवाडी १, न्यायमूर्तीनगर १, पुंडलिकनगर ४, प्रकाशनगर २, एन-१३ येथे १, सुधाकर नगर २, बीड बायपास रोड १६, शहानूरवाडी ५, ग्रीन्स कॉलनी १, अर्बन व्हॅली १, बायजीपुरा २, हर्सूल २, दिशानगरी १, अथर्व रॉयल्स सोसायटी १, शांतीपुरा २, रेणुकानगर १, ग्रीन्स ऑपोसाइट बजाज हॉस्पिटल १, जानकीपुरी कॉलनी १, शहानूरमियाँ दर्गा ३, हनुमाननगर ३, विश्रांतीनगर १, समर्थनगर ७, चेलीपुरा १, बेगमपुरा १, दिवान देवडी १, सह्याद्री हिल्स १, चाटे स्कूलजवळ १, म्हसोबानगर १, सिटी चौक २, बालाजीनगर ४, रॉक्सी टॉकीज १, देवानगरी २, रेहान कॉलनी १, सराफा रोड १, शांतिनिकेतन कॉलनी १, मोंढा नाका १, पुष्पनगरी २, सेंट्रल नाका १, श्रेयनगर १, जमना अपार्टमेंट १, एमजीएम स्टाफ १, शहागंज २, पीडब्लूडी कॉलनी १, भारतनगर १, एन-१, सिडको ३, आकाशवाणी २, एन-७ येथे ३, जाधववाडी ४, संजय नगर १, कटकट गेट १, एन-५, सिडको २, रघुवीरनगर १, एन-६, सिडको १०, शिवाजीनगर १६, अरिहंतनगर १, पवननगर १, मयूर पार्क ३, कोटला कॉलनी १, जालना रोड १, त्रिमूर्ती चौक १, तापडियानगर ३, एस.टी. कॉलनी १, विष्णुनगर ५, देशमुखनगर १, विजयनगर ३, तोरणानगर १, हर्सूल ६, गजानन कॉलनी १, जयभवानीनगर १, हुसेन कॉलनी १, आदित्यनगर १, हडको कॉर्नर १, टिळकनगर २, वसंतविहार १, एम.जी.एम. होस्टेल २, एस.टी. कॉलनी जाधववाडी १, जयभवानीनगर १, एस.बी. कॉलनी १, चिंतामणी कॉलनी ३, खोकडपुरा १, १३ वी योजना सिडको १, ज्योतीनगर ५, कुंभारवाडा १, भाग्यनगर १, जटवाडा रोड २, एन-१२ येथे २, म्हाडा कॉलनी ३, रेल्वे स्टेशन ४, उत्तरानगरी १, सिडको २, ब्रिजवाडी १, विद्यानारायण नगर १, अयोध्यानगर १, जागृत हनुमान मंदिर १, मंगलमूर्ती हाऊसिंग सोसायटी १, कडाभवन १, सनी सेंटर १, सेवन हिल १, दिल्ली गेट १, साईनगर १, भावसिंगपुरा १, एमजीएम कॅम्पस १, अदालत रोड १, दर्जी बाजार छावणी १, पहाडसिंगपुरा १, भडकल गेट १, आलोकनगर सातारा १, नंदनवन कॉलनी १, मोंढा मिसारवाडी १, बसैयेनगर १, सह्याद्रीनगर १, हरिरामनगर १, इंदिरानगर २, मयूरबन कॉलनी १, नाथ व्हॅली शाळा १, एसआरपीएफ कॅम्प १, ज्युबली पार्क १, उमर कॉलनी १, निशांत पार्क २, विनायकनगर १, अरुणोदय कॉलनी १, इतर ४९१

ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर २८, रांजणगाव २, देऊळगाव बाजार सिल्लोड १, सारा परिवर्तन हर्सूल सावंगी ४, म्हाडा कॉलनी पंढरपूर १, चिते पिंपळगाव १, गोलवाडी शिवार १, मिरसीपुरा अजिंठा १, पिसादेवी ३, अब्दीमंडी १, वांजरवाडी ७, वडगाव १, सिडको वाळूज १, लिंबे जळगाव १, तिसगाव ६, सिडको महानगर १, विठ्ठलभूमी पंढरपूर १, गंगोत्री पार्क १, सुविधा हॉटेल १, गजानन महाराज हाऊसिंग सोसायटी १, साजापूर १, विटखेडा १, वाळूज १, वडगाव कोल्हाटी २, साजापूर वाळूज १, वाळूज महानगर १, पंढरपूर १, अंबेलोहळ गंगापूर १, शेंद्र एमआयडीसी १, रांजणगाव एमआयडीसी १, गोळेगाव १, अन्य १६३

Web Title: Corona patients continues to rise in Aurangabad, adding 1,271 new patients in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.