कोरोना प्रतिपूर्ती देयके जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:05 AM2021-03-26T04:05:52+5:302021-03-26T04:05:52+5:30
शिक्षक भारतीची मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे मागणी --- औरंगाबाद : शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे कोरोना उपचार वैद्यकीय प्रतिपूर्तीची ...
शिक्षक भारतीची मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे मागणी
---
औरंगाबाद : शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे कोरोना उपचार वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन समितीकडून पडताळून व प्रमाणित करून घेऊन मगच ती वित्त विभागात सादर करावीत, असा आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांनी काढला. त्याला विरोध करत देयके जिल्हा परिषद स्तरावरच निकाली काढण्याची मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे यांनी केली.
आरोग्य विभागाने १७ डिसेंबर २०२० चे परिपत्रक जारी करून श्वसनाशी निगडित खर्चिक उपचाराचा रोग म्हणून आकस्मिक व गंभीर आजाराच्या यादीत कोरोनाचा समावेश केला. दरम्यान, चेक पोस्ट, रेशन दुकान, कंटेन्मेंट झोन, सर्वेक्षण आदी कामांत प्रशासनाने शिक्षकांना गुंतविल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित व्हावे लागले. त्यांना आर्थिक मदत व दिलासा देण्याची गरज असताना हक्काच्या प्रतिपूर्ती देयकात अडथळे निर्माण केले जात असल्याबद्दल शिक्षक भारतीने मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांना दिलेल्या निवेदनात नाराजी व्यक्त केली. यावेळी सुनील चिपाटे, मच्छिंद्र भराडे आदींची उपस्थिती होती.