अर्ध्या तासात कोरोना रिपोर्ट; आता औरंगाबादेतही अँटीजन टेस्टला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 07:57 PM2020-06-24T19:57:33+5:302020-06-24T20:00:12+5:30

राज्य शासनाने मंगळवारी औरंगाबाद महापालिकेला अत्यंत अत्याधुनिक अँटीजन टेस्ट करण्याची परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Corona report in half an hour; Antigen test approved in Aurangabad now | अर्ध्या तासात कोरोना रिपोर्ट; आता औरंगाबादेतही अँटीजन टेस्टला मंजुरी

अर्ध्या तासात कोरोना रिपोर्ट; आता औरंगाबादेतही अँटीजन टेस्टला मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देअँटीजन टेस्टसाठी लागणाऱ्या कीट खरेदीची मुभा शासनाने महापालिका प्रशासनाला दिली आहे. दिल्लीत केजरीवाल सरकारने चार दिवसांपूर्वीच या अत्याधुनिक टेस्ट पद्धतीचा अवलंब केला आहे.

औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाने चांगलेच हात-पाय पसरले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक रॅपिड अँटीजन टेस्टचा वापर सर्वत्र करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरातही महापालिकेला अँटीजन टेस्ट करण्याची राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या टेस्टमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आहे किंवा नाही याबाबतचा अहवाल अवघ्या तीस मिनिटांमध्ये प्राप्त होतो. 

मागील चार महिन्यांपासून औरंगाबाद शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा आकडा साडेतीन हजारांपर्यंत पोहोचला आहे. २०० पेक्षा अधिक कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागला. दररोज शहर आणि आसपासच्या परिसरात १५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेची अक्षरश: झोप उडाली आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असताना दररोज दहापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू होत आहे. केंद्र शासनाने मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. सर्व शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही रुग्णांचा जीव वाचविणे अवघड झाले आहे. कोरोनासंदर्भात शासकीय यंत्रणेला यश मिळायला तयार नाही. 

दरम्यान, राज्य शासनाने मंगळवारी औरंगाबाद महापालिकेला अत्यंत अत्याधुनिक अँटीजन टेस्ट करण्याची परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत केजरीवाल सरकारने चार दिवसांपूर्वीच या अत्याधुनिक टेस्ट पद्धतीचा अवलंब केला आहे. दररोज सात हजारहून अधिक टेस्ट या पद्धतीने करण्यात येत आहेत. अँटीजन टेस्टसाठी लागणाऱ्या कीट खरेदीची मुभा शासनाने महापालिका प्रशासनाला दिली आहे. 

अँटीजन टेस्ट कशा पद्धतीने होते
01.शहरात दररोज ४०० पेक्षा अधिक संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात येत आहेत. दिवसभरात जमा केलेले लाळेचे नमुने घाटी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येतात. प्राप्त झालेल्या नमुन्याचे अहवाल दुसऱ्या दिवशी सकाळी प्राप्त होतात. 
02. अँटीजन टेस्टमध्ये रुग्णाच्या नाकातून नमुने घेतले जातात. एका छोट्या मशीनवर याची तपासणी शक्य आहे. ज्या कीटवर तपासणी होते त्यावर दोन लाल रेषा दिसून आल्यास रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येते. एकच लाल रेषा कीटवर दिसून आल्यास रुग्ण निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात येते. 

Web Title: Corona report in half an hour; Antigen test approved in Aurangabad now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.