खंडोबा यात्रेवर यंदा कोरोनाचे सावट
By | Published: November 28, 2020 04:06 AM2020-11-28T04:06:14+5:302020-11-28T04:06:14+5:30
अनलॉक प्रक्रियेत मंदिरे दर्शनासाठी खुली झाली असली तरी गर्दी टाळण्याचा तसेच फिजिकल डिस्टन्स राखण्याचा नियम पाळूनच दर्शन ...
अनलॉक प्रक्रियेत मंदिरे दर्शनासाठी खुली झाली असली तरी गर्दी टाळण्याचा तसेच फिजिकल डिस्टन्स राखण्याचा नियम पाळूनच दर्शन घ्यावयाचे आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर सर्वांसाठी सक्तीचाच केलेला आहे. भक्ताची तपासणी करूनच मंदिरात प्रवेश देण्याचे आदेश आहेत. त्या नियमांचे पालन करुनच भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडले जाणार आहे.
शासनाच्या आदेशाचे पालन...
डिसेंबरमध्ये यात्रा उत्सव असल्याने विश्वस्तांनी परवानगी मागितली आहे. परंतु नियमामुळे ती मिळेल की नाही हे सांगता येणार नाही. कोरोनाचे संकट असल्याने अखेर शासनाच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.
- साहेबराव पळसकर ,अध्यक्ष (खंडोबा मंदिर देवस्थान)
परवानगी देता येत नाही...
कोरोनाचा प्रादुर्भाव होईल असे कोणतेही उत्सव साजरे केले जाणार नाही की, गर्दी होणार नाही. परिसरातील रूग्ण संख्या पाहता दक्षता म्हणून उत्सवाला प्रशासनाकडून परवानगी देणे शक्य नाही.
- सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (सातारा पोलीस ठाणे)