कोरोनाने नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांचे स्वप्न भंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:05 AM2021-05-22T04:05:07+5:302021-05-22T04:05:07+5:30
ग्रामीण भागातील अनेक तरुण विविध सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी करीत आहे. तसेच काहीजण पोलीस व सैनिक भरतीचीही ...
ग्रामीण भागातील अनेक तरुण विविध सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी करीत आहे. तसेच काहीजण पोलीस व सैनिक भरतीचीही तयारी करीत आहेत. मात्र मध्येच कोरोनाची माशी शिंकली. आणि सर्व तयारीवर पाणी फेरले गेले आहे. दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया थंड बस्त्यात आहे, यामुळे परीक्षांसाठी वयाची मर्यादा संपत आलेल्या तरुणांसाठी हा काळ अत्यंत धोकादायक ठरला असून अनेकांची मेहनत वाया गेली आहे. त्याचप्रमाणे अनेक खाजगी उद्योगही बंद पडल्याने अनेक तरुण बेकार झाले आहेत. कोरोना आज नाहीतर उद्या आटोक्यात येईल, मात्र आमचे भरतीचे वय संपल्याने यापूर्वी केलेली सर्व तयारी मातीत गेल्याची भावना तरुण बोलून दाखवित आहेत. त्यासाठी शासनाने भरतीचे वय वाढवले पाहिजे अशी भावना तरुण व्यक्त करीत आहेत.
कोट
भरती प्रकिया लवकर घ्या, आमचे वय संपत चालले आहे. लवकरात लवकर याबाबत शासनाने निर्णय घेऊन तरुणांना दिलासा द्यावा, अन्यथा आम्ही आंदोलन करु.
- ॲड. प्रितेशसिंग गौर, जिल्हाध्यक्ष, पोलीस बॉईज संघटना, औरंगाबाद
कोट
मी पोलीस भरतीसाठी खूप मेहनत केली. भरतीसाठी फॉर्मही भरला मात्र कोरोनामुळे सर्वच भरती थांबल्याने माझी मेहनत वाया गेली असून वयोमर्यादा संपली आहे.
- रमेश बडक, तरुण