सोयगाव तालुक्यात पुन्हा कोरोना सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:05 AM2021-06-06T04:05:11+5:302021-06-06T04:05:11+5:30
सोयगाव : पाच दिवसांपासून कोरोना संसर्गाची साखळी तुटलेली असताना अचानक शनिवारी सोयगाव तालुक्यात पुन्हा कोरोना सुसाट सुटला आहे. आणखी ...
सोयगाव : पाच दिवसांपासून कोरोना संसर्गाची साखळी तुटलेली असताना अचानक शनिवारी सोयगाव तालुक्यात पुन्हा कोरोना सुसाट सुटला आहे. आणखी सात नवीन रुग्णांची भर पडली असून त्यांच्यावर जरंडी कोविड केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
तालुक्यात १ जून रोजी बाधित सर्व रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. त्यामुळे सोयगावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली होती. त्यानंतर पाच दिवसांपासून एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे दिलासादायक चित्र होते. तोच शनिवारी दोन गावांमध्ये सात जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुटकेचा श्वास सोडलेल्या तालुका प्रशासानाला पुन्हा धडकी भरली आहे. बाधित सातही रुग्णांना जरंडी कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
लसीचा तुटवडा ठरू शकतो तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत
सोयगाव तालुक्यात महिनाभरापासून १८ ते ४४ वर्षांच्या तरुणांचे लसीकरण बंद झालेले आहे. कोविशिल्डसाठी दररोज नवनवीन नियमावली तयार करण्यात आल्याने कोविशिल्डचे लसीकरणही व्यवस्थित होत नाही. त्यातच कोव्हॅक्सिनचा तुटवडा आणि कोविशिल्डसाठीचे बदलते नियम हे तालुक्याला तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू शकतात. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे.