तीन हजार शिक्षकांची कोरोना तपासणी, ६५ पॉझिटिव्ह
By | Published: November 22, 2020 09:01 AM2020-11-22T09:01:56+5:302020-11-22T09:01:56+5:30
स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू केली होती. याचाच एक भाग म्हणून शिक्षक, शिक्षकेतर ...
स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू केली होती. याचाच एक भाग म्हणून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे सक्तीचे करण्यात आले. महानगरपालिकेतर्फे शहरातील १६ ठिकाणी कोरोना चाचणी उपलब्ध करून देण्यात आली. गुरुवार आणि शुक्रवारी २ हजार ८९९ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६५ जणांना बाधा झाल्याचे निदर्शनास आले. शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी १,६७६ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर पद्धतीने कोरोना चाचणी करण्यात आली.
आज तपासणी केल्याचा अहवाल रविवारी सकाळी महापालिकेला प्राप्त होईल. मागील तीन दिवसांमध्ये महापालिकेने ४ हजार ५७५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी केली. कोरोना तपासणीसाठी चिकलठाणा आरोग्य केंद्र, रामनगर, रिलायन्स मॉल, शिवाजीनगर, तापडिया कासलीवाल मैदान, बायजीपुरा, हर्षनगर, एन-८, एन-११, एन-२, छावणी, सिपेट कोविड सेंटर, किलेअर्क, एमजीएम, पदमपुरा, एमआयटी कोविड सेंटर येथे व्यवस्था करण्यात आली आहे.