व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:05 AM2021-06-09T04:05:36+5:302021-06-09T04:05:36+5:30

शहरात चार ठिकाणी व्यापाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी केंद्र सुरू केले आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी चाचण्या ...

Corona testing of traders by RTPCR method | व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी

व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी

googlenewsNext

शहरात चार ठिकाणी व्यापाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी केंद्र सुरू केले आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी चाचण्या केल्या जातील. शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवरदेखील बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तींच्या करोना चाचणीसाठी चोवीस तास पथके तैनात करण्यात आली आहेत. दहा फिरत्या पथकांच्या साहाय्याने शहरात विविध ठिकाणी कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत. व्यापाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी बायजीपुरा आरोग्य केंद्र, औरंगपुरा आरोग्य केंद्र, संत तुकाराम नाट्यगृह सिडको एन ५, एमआयटी कॉलेज इमारत क्रमांक २ येथे व्यवस्था केली आहे असे मनपाच्या आरोग्य विभागाने कळविले.

-

४३९१ जणांनी घेतली लस, १०४ दिव्यांगांचाही सहभाग

औरंगाबाद : सोमवारी दिवसभरात ४ हजार ३९१ नागरिकांनी कोरोना लस घेतली. दिव्यांग व्यक्तींसाठी व ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नाही अशा व्यक्तींसाठीदेखील महापालिकेने लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे, त्यात १०४ जणांनी लस घेतली.

महापालिकेच्या माध्यमातून मेगा लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती, ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नाही अशा व्यक्तींसाठीदेखील लसीकरण मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे.

म्युकरमायकोसिसने आणखी दोन जणांचा मृत्यू, नवीन ९ रुग्ण दाखल

औरंगाबाद : सोमवारी दिवसभरात म्युकरमायकोसिसने दोन जणांचा मृत्यू झाला असून, नवीन ९ रुग्ण दाखल झाले आहेत. सध्या ८९५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. महिनाभरापासून म्युकरमायकोसिसच्या आजाराचे रुग्ण वाढतच आहेत. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केली जात आहे. म्युकरमायकोसिसच्या आजाराने दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबरच नवीन ९ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी २ जण घाटी रुग्णालयात तर ७ जण खासगी रुग्णालयात दाखल आहेत. १८ रुग्णालयात ८९५ रुग्ण आतापर्यंत दाखल झाले आहेत. त्यापैकी ३०५ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर विविध रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १४ जणांना डिस्चार्ज मिळाला.

Web Title: Corona testing of traders by RTPCR method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.