चिंचोली लिंबाजीत शिक्षकांच्या कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:05 AM2021-01-23T04:05:11+5:302021-01-23T04:05:11+5:30
शालेय शिक्षण विभागाने १८ जानेवारीला काढलेल्या आदेशान्वये पाचवी ते आठवीचे वर्ग शुक्रवारपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या ...
शालेय शिक्षण विभागाने १८ जानेवारीला काढलेल्या आदेशान्वये पाचवी ते आठवीचे वर्ग शुक्रवारपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांच्या आरटीपीसीआर कोरोना चाचण्या करणे बंधनकारक असून त्याअनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली लिंबाजीत व शेलगाव केंद्रातील ५० शिक्षकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. याप्रसंगी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे स्वॅब घेण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच शासनाच्या नियमानुसार २७ जानेवारीपासून पाचवी व आठवीचे वर्ग विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आरोग्यविषयक खबरदारी बाळगून सुरू होणार आहे. याप्रसंगी चिंचोली लिंबाजी केंद्राचे केंद्रप्रमुख के.आर. सपकाळ, केंद्रीय मुख्याध्यापक कैलास झोंड, शेलगाव केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक भीमसिंग बिलंगे, शिवनाथ वाढेकर, आरोग्य कर्मचारी काथार उपस्थित होते.
- कॅप्शन : चिंचोली लिंबाजी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिक्षकांच्या कोरोना आरटीपीसीआर चाचण्या घेताना आरोग्य कर्मचारी.