सिल्लोड तालुक्यातील १३३ जणांना कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:04 AM2021-01-17T04:04:51+5:302021-01-17T04:04:51+5:30
शनिवारी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी रुग्णालय फुलांनी सजविण्यात ...
शनिवारी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी रुग्णालय फुलांनी सजविण्यात आले होते. ही लस आपल्यासाठी नवसंजीवनी असल्याचे मत याप्रसंगी सत्तार यांनी व्यक्त केले. सिल्लोड शहरातील डॉ. विकास गोठवाल व उपजिल्हा रुग्णालयातील नर्स हेमलता कोळी यांना प्रथम लस टोचण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल सरदेसाई, पो.नि. राजेंद्र बोकडे, आदींची यावेळी उपस्थिती होती
चौकट
दुसरा टप्पा बुधवारपासून
सिल्लोड येथे २०० लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून १३३ लोकांना लस देण्यात आली. आता उर्वरित डायबेटिस कर्मचाऱ्यांसह गर्भवती असलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना बुधवारी दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाणार असल्याचे डॉ. योगेश राठोड यांनी सांगितले.
फोटो कॅप्शन : सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाचे उद्घाटन करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार. सोबत उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत आदी.
२) सिल्लोड शहरातील डॉ. विकास गोठवाल व उपजिल्हा रुग्णालयातील नर्स हेमलता कोळी यांना प्रथम लसीकरण करण्यात आले.