Corona Vaccination : औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ११.९७ टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:57 PM2021-06-03T16:57:38+5:302021-06-03T16:59:58+5:30

Corona Vaccination in Aurangabad : जिल्ह्यातील लोकसंख्या ३८ लाखांवर आहे. त्या तुलनेत प्राप्त होणाऱ्या लसींचे प्रमाण अत्यल्प आहे.

Corona Vaccination: Only 11.97 per cent vaccination in Aurangabad district | Corona Vaccination : औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ११.९७ टक्के लसीकरण

Corona Vaccination : औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ११.९७ टक्के लसीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देप्राप्त होणाऱ्या लसींच्या डोसमध्ये १० टक्के डोस हे वेस्टेज पकडण्यात येते. एक व्हायल काढल्यानंतर ४ तासांच्या आत ती वापरणे आवश्यक असते.

औरंगाबाद : औरंगाबादेत १६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात लसीकरण सुरू झाले. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्याचे लसीकरण झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्यात फ्रंटलाइन, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील लोकसंख्या ३८ लाखांवर आहे. त्या तुलनेत प्राप्त होणाऱ्या लसींचे प्रमाण अत्यल्प आहे. परिणामी, वेळाेवेळी लसीकरणात अडथळा निर्माण झाला. त्यातही १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण थांबविण्याची नामुष्कीही ओढवली. या सगळ्यात जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ११.९७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे ३८ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी किती वर्षे जातील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

०.६ टक्के डोस वाया
- प्राप्त होणाऱ्या लसींच्या डोसमध्ये १० टक्के डोस हे वेस्टेज पकडण्यात येते. औरंगाबादेत लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रारंभी ५ टक्के लस वाया जाण्याचे प्रमाण होते.
- एक व्हायल काढल्यानंतर ४ तासांच्या आत ती वापरणे आवश्यक असते. त्यासाठी किमान १० लाभार्थी असणे आवश्यक असते. अन्यथा त्या वेळेनंतर डोस वाया जातो.
- साधारण ५ टक्के डोस वाया जाणे अपेक्षित असते; परंतु आपल्याकडे एक टक्क्यापेक्षा कमी म्हणजे ०.६ टक्के डोस वाया जाण्याचे प्रमाण असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. विजयकुमार वाघ यांनी सांगितले.

आतापर्यंत झालेले लसीकरण...
आरोग्य कर्मचारी

- पहिला डोस- ३९, ८५९
- दुसरा डोस-२१,६५०
- लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-४,१४१

फ्रंटलाइन वर्कर्स
-पहिला डोस-६५,२७३
-दुसरा डोस-२३,८६०
-लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-७२७

ज्येष्ठ नागरिक
-पहिला डोस-१,४७,४६१
-दुसरा डोस-४२,०९७
-लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-४२,५३९

४५ ते ५९ वयोगट
-पहिला डोस- १,८९,४२७
-दुसरा डोस- ४१,७७५
-लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-१,१०,५७३

१८ ते ४४ वयोगट
-पहिला डोस- १२,९३१
-दुसरा डोस-०
-लसीकरणासाठी प्रतीक्षेत लाभार्थी-३१,८७,०६९

जिल्ह्याला मिळालेला लसींचा साठा
-कोविशिल्ड-५,९२,३००
-काेव्हॅक्सिन-४९,८१०

आतापर्यंत झालेले लसीकरण....
- कोविशिल्ड
पहिला डोस-४,३३,६३७
दुसरा डोस-१,१८,३८४

- कोव्हॅॅक्सिन
पहिला डोस-२१,३१४
दुसरा डोस-१०,९९८

Web Title: Corona Vaccination: Only 11.97 per cent vaccination in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.