मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस, सिल्लोड तालुक्यातील प्रकार, आरोग्य खात्यातील सावळागोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 06:22 AM2021-12-28T06:22:58+5:302021-12-28T06:23:28+5:30

Aurangabad : उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्वताबाई अहेलाजी पाटील (७८) यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी १ वाजून ५ मिनिटांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याची नोंद आहे.

corona vaccine given to dead woman at Sillod taluka in Aurangabad, confusion in health department | मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस, सिल्लोड तालुक्यातील प्रकार, आरोग्य खात्यातील सावळागोंधळ

मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस, सिल्लोड तालुक्यातील प्रकार, आरोग्य खात्यातील सावळागोंधळ

googlenewsNext

- रघुनाथ सावळे 

उंडणगाव (जि. औरंगाबाद) : कोरोनाने मयत झालेल्या महिलेवर  आरोग्य यंत्रणेनेच अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर चक्क सात महिन्यांनी १८ डिसेंबर रोजी तिला कोविडचा पहिला डोस दिल्याचा संदेश पाठवल्याने  आरोग्य खात्यामधला सावळागोंधळ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. 

उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्वताबाई अहेलाजी पाटील (७८) यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी १ वाजून ५ मिनिटांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याची नोंद आहे. याबाबत त्यांच्या  मुलगा सूर्यभान पाटील यांच्या मोबाइलवर  पार्वताबाई यांनी कोविशिल्ड लस घेतल्याचा संदेश आला. त्यानंतर त्यांचे लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्रसुद्धा आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहे.  

उपचारादरम्यान झाला होता मृत्यू 
पार्वताबाई या २१ एप्रिलला आजारी पडल्याने त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. कोरोना चाचणीत त्या पाॅझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर घाटीतच उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांचे २ मे रोजी निधन झाले. पार्वतीबाईंच्या मृत्यूची घाटी रुग्णालयासह सिडको पोलीस ठाण्यात नोंद असून, सिडको एन-८ भागातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे.

- अहेलाजी पाटील (७८) यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी १ वाजून ५ मिनिटांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. 

 - अंत्यसंस्कानंतर चक्क ७ महिन्यांनी १८ डिसेंबर रोजी दिला कोविडचा पहिला डोस 

अशी चूक शक्यच नाही
या प्रकाराची चौकशी करू; पण असे होणे अशक्य आहे. याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन तातडीने चौकशी करण्यात येईल.
- डॉ. अर्चना सपकाळ, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र, उंडणगाव

Web Title: corona vaccine given to dead woman at Sillod taluka in Aurangabad, confusion in health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.