CoronaVirus : औरंगाबादेत आणखी १७ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या २७३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 08:34 AM2020-05-03T08:34:39+5:302020-05-03T08:35:29+5:30
शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे
औरंगाबाद: औरंगाबादेत कोरोग्रस्तांची साखळी वाढतच आहे. रविवारी सकाळी आणखी १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. मुकुंदवाडी १६ आणि बायजीपुरा येथील १ अशा १७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली
त्यामुळे बाधितांचा एकूण संख्या २७३ वर गेली आहे.
शहरात १५ मार्चला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर गेल्या दिड महिन्यात ५३ रुग्ण होते. २७ एप्रिलपासून २९,२७,२१,४९,३९, ४०, १७ अशी दर दिवशी अनुक्रमे वाढ झाली. केवळ या सात दिवसांत २२३ रुग्णांची भर पडली. शहरातील बाधितांची संख्या २७३ वर पोहचली. यातील नऊ जणांचे मृत्यू झाले असुन २४ जण कोरोनामुक्त झाले. तर एक रुग्ण पुन्हा बाधित झाला. यात नव्या भागांतही बाधित आढळायला सुरुवात झाल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.
असे वाढले रुग्ण
२७ एप्रिल २९
२८ एप्रिल २७
२९ एप्रिल २१
३० एप्रिल ४७
१ मे ३९
२ मे ४०
३ मे १७
--
२७३ एकुण कोरोना पॉझीटीव्ह
०९ मृत्यू
२४ कोरोनामुक्त
०१ पुन्हा बाधित