CoronaVirus : औरंगाबादेत आणखी १७ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३७३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 09:04 AM2020-05-07T09:04:22+5:302020-05-07T09:05:19+5:30

नव्या भागातही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे

Corona virus: 17 more positive in Aurangabad,total 373 patients | CoronaVirus : औरंगाबादेत आणखी १७ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३७३

CoronaVirus : औरंगाबादेत आणखी १७ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३७३

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबादेत गुरुवारी सकाळी १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या आता ३७३ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली.

आज सकाळी जयभीमनगर येथे २ , किलेअर्क येथे २, हक टॉवर रेलवेस्टशन रोड येथे ५ , पुंडलीकनगर येथे ५ आणि कटकट गेट येथे ३ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे.

५१ भागांत कोरोनाची लागण
आतापर्यंत शहरातील ४६ भागांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. बुधवारी त्यात ५ नव्या भागांची भर पडल्याने आता ही संख्या ५१ झाली आहे. यात ४० भागांतील रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ११ भागांतील काही रुग्ण कोरोनामुक्त, तर काहींचा मृत्यू झालेला आहे.

२ हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
घाटी परिसरातील जयभीमनगर आणि मुकुंदवाडीतील संजयनगर-रोहिदासनगर या दोन हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जयभीमनगर येथील रुग्णसंख्या आता ६१ झाली आहे. तर संजयनगर-रोहिदासनगर येथील रुग्णसंख्या ६७ वरून ७४ झाली आहे. शहरात सर्वाधिक रुग्णसंख्या या दोन हॉटस्पॉटमध्ये आहे.
 

Web Title: Corona virus: 17 more positive in Aurangabad,total 373 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.