Corona virus In Aurangabad : शहरात १९ तर ग्रामीणमध्ये ९४ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:55 AM2021-06-12T11:55:14+5:302021-06-12T11:57:19+5:30
जिल्ह्यात ११३ बाधित रुग्ण आढळले
औरंगाबाद : जिल्ह्यात ११३ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. यात महानगरपालिकेच्या हद्दीत अवघे १९, ग्रामीणमध्ये ९४ बाधित आढळले. तर ९ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १७५ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने घरी परतले. शहरातील ६८ तर ग्रामीण भागातील १०८ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४४४८६ झाली आहे. आजपर्यंत १,३९,२१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ३,३२२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १,९४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
मनपा हद्दीत १९ रुग्ण
घाटी ५, नवजीवन कॉलनी १, हर्सूल १, उस्मानपुरा १, स्वराज नगर १, ज्योती नगर १, अन्य ८.
ग्रामीण भागातील ९४ रुग्ण
गदाना १, सांजोळ १, भांडगाव १, कसाबखेडा १, शिरसमाळ, दौलताबाद १, औरंगाबाद तालुक्यात ६, फुलंब्री ३, गंगापूर १२, कन्नड २३, खुलताबाद ५, सिल्लोड ४, वैजापूर ३०, पैठण ११ तर सोयगाव तालुक्यात एकही रुग्ण शुक्रवारी आढळून आला नाही.
९ बाधितांचे मृत्यू
घाटी रुग्णालयात वडनेर येथील ६० वर्षीय महिला, पिशोर येथील ६४ वर्षीय महिला, चिकलठाणा येथील ६५ वर्षीय महिला, शांतीपुरा येथील ७६ वर्षीय महिला, सीतानाईक तांडा येथील ६५ वर्षीय पुरुष, सटाणा येथील ६५, जिल्हा सामान्य रुग्णालयात दोनवाडा येथील ७० वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात भावसिंगपुरा येथील ५८ वर्षीय पुरुष, गोळेगाव येथील ३९ वर्षीय पुरुष रुग्णांचा मृतात समावेश आहे.