Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा ३ अंकी वाढ; १२० कोरोनाबाधितांची भर, ७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 02:33 PM2021-06-16T14:33:29+5:302021-06-16T14:34:01+5:30

corona virus सध्या जिह्यात १४३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

Corona Virus: 3 digit increase in Aurangabad district again; Addition of 120 coronaviruses, 7 deaths | Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा ३ अंकी वाढ; १२० कोरोनाबाधितांची भर, ७ मृत्यू

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा ३ अंकी वाढ; १२० कोरोनाबाधितांची भर, ७ मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देउपचारानंतर २६८ जणांना सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात १२० कोरोनाबाधितांची भर पडली. सलग सहा दिवस शंभराखाली रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी ग्रामीण भागात १००, तर औरंगाबाद शहरात २० रुग्ण वाढले. ७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यूृ झाला. दिवसभरात २६८ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.

शहरातील २१, तर ग्रामीण भागातील २४७ रुग्ण मंगळवारी उपचार पूर्ण झाल्याने घरी परतले. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १ लाख ४४ हजार ९०८ झाली आहे, तर आजपर्यंत १ लाख ४० हजार ११४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. उपचारादरम्यान एकूण ३ हजार ३५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या १४३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात शहरातील १४०, तर ग्रामीणमधील १२९८ रुग्णांचा समावेश आहे.

मनपा हद्दीत २० रुग्ण
बीड बायपास २, शांतिपुरा १, सईदा कॉलनी एनएस पार्क १, गुरुदत्तनगर १, एन-७ पोलीस कॉलनी २, सुरेवाडी हर्सुल १, हिरापूर १, एन-३ सिडको १, कैलासनगर जालना रोड १, एटीपीओ बेंडवाडी १, चिकलठाणा १, जय भवानीनगर १, अन्य ६.

ग्रामीण भागातील १०० रुग्ण
फुलंब्री १, कचनेर जिल्हा परिषद शाळेजवळ १, सावता नगर कमलापूर १, रामराई रोड वाळूज १, देऊळगाव बाजार १ , औरंगाबाद तालुक्यात ९, फुलंब्री तालुक्यात ५, गंगापूर तालुक्यात १४, कन्नड तालुक्यात १४, सिल्लोड ६, वैजापूर ३३, पैठण तालुक्यात १८ रुग्ण बाधित आढळून आले.

७ बाधितांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात दावलपुरी येथील ५५ वर्षीय महिला, फुलंब्री येथील ७० वर्षीय महिला, विरामगाव येथील ८५ वर्षीय पुरुष, जिल्हा सामान्य रुग्णालयात विहामांडवा येथील ६० वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात सुदर्शननगर येथील ६६ वर्षीय पुरुष, हनुमाननगर येथील ६६ वर्षीय पुरुष, ढोरकीन येथील ५० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Corona Virus: 3 digit increase in Aurangabad district again; Addition of 120 coronaviruses, 7 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.