Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी ५६ कोरोना रुग्णांची वाढ; ६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 01:37 PM2020-12-11T13:37:32+5:302020-12-11T13:41:21+5:30
Corona Virus In Aurangabad : गुरुवारी ९६ रुग्णांना उपचारादरम्यान सुटी
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या ५६ रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या ९६ रुग्णांना सुटी देण्यात आली, तसेच जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,१८० एवढी झाली आहे. यातील ४२,२७० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर १,१६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५६ रुग्णांत मनपा हद्दीतील ४५, ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७१ आणि ग्रामीण भागातील २५, अशा ९६ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. पडेगावातील ५२ वर्षीय पुरुष, हर्सूल पिसादेवी रोड येथील ६१ वर्षीय पुरुष, चौका येथील ६० वर्षीय पुरुष, एन-११ नवजीवन कॉलनी येथील ६४ वर्षीय पुरुष, द्वारकानगरातील ७२ वर्षीय स्त्री, अजबनगरातील ७० वर्षीय स्त्री या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ग्रामीण भागातील रुग्ण : मुधलवाडी, पैठण १, अन्य १०.
मनपा हद्दीतील रुग्ण :
उस्मानपुरा १, रेल्वे स्टेशन १, छावणी परिसर १, एन-३ सिडको १, उल्कानगरी १, बीड बायपास १, रामनगर २, पहाडसिंगपुरा १, रेल्वे स्टेशन परिसर २, मछली खडक १, आविष्कार कॉलनी १, ईटखेडा १, अयोध्यानगर १, मध्यवर्ती बसस्थानक परिसर १, हरिप्रसादनगर १, एन-११ सिडको १, हर्सूल १, शाहनूरवाडी १, अन्य २५.