Corona Virus : शहरात ७, तर ग्रामीणमध्ये १६ कोरोनारुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 01:15 PM2021-05-22T13:15:36+5:302021-05-22T13:20:49+5:30

Corona virus : सध्या जिल्ह्यात ६ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू

Corona virus: 7 deaths in urban areas and 16 in rural areas of Aurangabad | Corona Virus : शहरात ७, तर ग्रामीणमध्ये १६ कोरोनारुग्णांचा मृत्यू

Corona Virus : शहरात ७, तर ग्रामीणमध्ये १६ कोरोनारुग्णांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देशुक्रवारी ४६२ कोरोनारुग्णांची भर दिवसभरात ५७५ रुग्णांची सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात ४६२ रुग्णांची नव्याने भर पडली, तर ५७५ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असलेल्या २३ बाधितांचा मृत्यू झाला, तर ६ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरूआहेत.

शहरातील ११६ तर ग्रामीण भागातील ४५९ रुग्ण शुक्रवारी उपचार पूर्ण झाल्याने घरी परतले. दिवसभरात शहरात १४३ तर ग्रामीण भागात ३१९ बाधित आढळून आले. जिल्ह्यात शहर आणि ग्रामीणमध्ये बाधित आढळून आलेल्यांपेक्षा उपचार पूर्ण झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या घटून ६ हजार १२४ झाली आहे. आजपर्यंत १ लाख ३९ हजार ६०५ रुग्ण बाधित आढळून आले, तर १ लाख ३० हजार ४५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३०२८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले.

शहरात १४३ रुग्ण
घाटी परिसर ३, राधास्वामी कॉलनी १, हर्सूल ४, नारळीबाग १, नंदनवन कॉलनी १, पैठण गेट १, म्हाडा कॉलनी ४, जालाननगर २, उस्मानपुरा २, वेदांतनगर १, गादीया विहार १, रेल्वे स्टेशन १, गारखेडा ३, ज्योतीनगर १, बालाजी नगर १, गजानननगर २, पडेगाव १, मयूर पार्क ५, जयभवानीनगर २, मेहरनगर १, मुकुंदवाडी ६, एन-१ येथे २, रामनगर २, विठ्ठलनगर १, उल्कानगरी १, हनुमान नगर ३, गजानन कॉलनी १, विजयनगर २, गजानन मंदिर १, भावसिंगपुरा १, हुसेन कॉलनी १, सातारा परिसर ३, बीड बायपास २, चंद्रशेखर नगर १, साई नगर १, नवजीवन कॉलनी १, शिवाजीनगर १, पोलीस कॉलनी १, हडको २, अयोध्या नगर १, सिडको ६, पिसादेवी रोड १, जाधववाडी २, होनाजीनगर १, कटकट गेट १, चिकलठाणा एमआयडीसी १, शहानूरवाडी ३, अरिहंत नगर १, अन्य ५४.

ग्रामीण भागात ३१९ रुग्ण
ग्रामीण भागात ३१९ रुग्ण आढळून आले. तालुकानिहाय औरंगाबाद २८, फुलंब्री ७, गंगापूर ३५, कन्नड ३९, खुलताबाद २५, सिल्लोड २६, वैजापूर ९४, पैठण ५९, सोयगाव ६ रुग्ण आढळले, तर ४ हजार ३८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

२३ बाधितांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात १६ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ७९ वर्षीय महिला वाकळा वैजापूर, ६५ वर्षीय पुरुष पिंप्री राजा, ३७ वर्षीय पुरुष मलवार बुलडाणा, ७० वर्षीय पुरुष नहिद नगर कटकटगेट, ७० वर्षीय महिला चिकलठाणा, ७० वर्षीय पुरुष नालंदा बुद्धविहार, ७२ वर्षीय पुरुष भावसिंगपुरा, ७० वर्षीय पुरुष वैजापूर, ५५ वर्षीय पुरुष कुंभेफळ, ५१ वर्षीय पुरुष कन्नड, ६५ वर्षीय महिला पूनम नगर जटवाडा, ७० वर्षीय पुरुष एमआयडीसी चिकलठाणा, ७० वर्षीय पुरुष पोखरी, ७० वर्षीय महिला उंडणगाव, ५७ वर्षीय पुरुष सावंगी, ५० वर्षीय महिला धामणगाव बदनापूर यांचा मृतांत समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ६५ वर्षीय पुरुष बरतकतपूर, ४० वर्षीय पुरुष गंगापूर, ६० वर्षीय महिला गिरणार तांडा, ६७ वर्षीय पुरुष देवगाव रंगारी, ४४ वर्षीय पुरुष घनवटवाडी, खासगी रुग्णालयातील ४८ वर्षीय पुरुष पिंपळदरी, ४५ वर्षीय पुरुष नागमठाण, ६८ वर्षीय पुरुष एन नऊ सिडको, ६७ वर्षीय पुरुष समर्थनगर येथील बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Corona virus: 7 deaths in urban areas and 16 in rural areas of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.