CoronaVirus In Aurangabad : कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ५३.७४ टक्के; आज १६६ बाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 10:04 AM2020-07-09T10:04:36+5:302020-07-09T10:10:42+5:30
औरंगाबाद जिल्ह्यात ४१.८५ टक्के रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी सकाळी १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या साडे सात हजार रुग्णांवर पोहचली आहे. तर बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या चार हजारांवर झाली आहे. घरी परतलेल्या रुग्णाचे प्रमाण ५३.७४ टक्के, मृत्यूचे प्रमाण ४.२९ टक्के तर उपचार सुरू रुग्णांचे प्रमाण ४१.८५ टक्क्यावर पोहचले आहे.
आढळलेल्या रुग्णांत मनपा हद्दीतील १०१ तर ग्रामीण भागातील ६५ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये ९० पुरूष तर ७६ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७५०४ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ४०३३ रुग्ण बरे झालेले असून ३३० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ३१४१ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा हद्दीत १०१ रुग्ण
कांचनवाडी १, मार्ड हॉस्टेल परिसर १, पद्मपुरा १, अविष्कार कॉलनी एन सहा १, जटवाडा रोड १, जयसिंगपुरा २, राम नगर १, बालाजी नगर १, शुभमंगल विहार १, विशाल नगर २, एन बारा सिडको १, एन नऊ सिडको २, स्वामी विवेकानंद नगर ४, रमा नगर ९, विठ्ठल नगर ३, रेणुका नगर ३, अमृतसाई प्लाजा २, जय भवानी नगर १, एन बारा हडको १, पवन नगर १, किर्ती सो., ३, रायगड नगर ९, मिसारवाडी १, म्हाडा कॉलनी १, सातारा परिसर २, गजानन कॉलनी १, चिकलठाणा १, एन अकरा, सिडको १, मुकुंदवाडी १, संजय नगर १, अजब नगर ६, गजानन नगर २, श्रद्धा कॉलनी १, लक्ष्मी कॉलनी २, भक्ती नगर ४, शिवशंकर कॉलनी १, हनुमान नगर १, अरिहंत नगर ३, बंजारा कॉलनी १, शिवाजी नगर १, जाधववाडी ३, पुंडलिक नगर १, खोकडपुरा ७, नारेगाव २, सेव्हन हिल १, टाईम्स कॉलनी १, राम नगर १, जाधववाडी १, विजय नगर १, गजानन नगर, गारखेडा परिसर १
ग्रामीण भागात ६५ रुग्ण
कन्नड १, जाकीर हुसेन नगर, सिल्लोड १, अजिंठा १, गोकुळधाम सो., बजाज नगर ६, नेहा विहार, सिडको महानगर, बजाज नगर ४, जय भवानी चौक, बजाज नगर ४, गणेश सो., बजाज नगर १, जगदंबा सो., वडगाव १, सिडको वाळूज महानगर एक २, फुले नगर, पंढरपूर १, सूर्यवंशी नगर, बजाज नगर १, द्वारकानगरी, बजाज नगर १, एकदंत रेसिडन्सी, बजाज नगर १, बाळासाहेब ठाकरे चौक, बजाज नगर २, संगम नगर, बजाज नगर ५, वडगाव, बजाज नगर २, वळदगाव, बजाज नगर २, नंदनवन सो., बजाज नगर २, सारा किर्ती, बजाज नगर १, नवजीवन सो., बजाज नगर २, न्यू सह्याद्री सो., मोरे चौक, बजाज नगर १, वंजारवाडी ८, शिवशंभो सो., बजाज नगर १, सावता नगर, रांजणगाव १, हतनूर, कन्नड १, नागापूर, कन्नड १, कारडी मोहल्ला, पैठण ३, कुंभारवाडा, पैठण ८ या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आहेत.