Corona Virus In Aurangabad : दिलासा ! उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ४ हजारांखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:18 AM2021-05-31T11:18:34+5:302021-05-31T11:20:24+5:30
रविवारी दिवसभरात उपचारादरम्यान २१ रुग्णांचा मृत्यू
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात २२९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील केवळ ६२, तर ग्रामीण भागातील १६७ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत २१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २० रुग्णांचा आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ७३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार ५१६ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३५ हजार ५८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,१९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १८५ आणि ग्रामीण भागातील ३४३, अशा ५२८ रुग्णांना सुटी देण्यात आली.
मालेगाव पिंपरी, सोयगाव येथील ६२ वर्षीय पुरुष, वाळूज येथील ४५ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ७० वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६२ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ५० वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, खुलताबाद येथील ५४ वर्षीय पुरुष, जयपूर, करमाड येथील ६६ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ७० वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ७५ वर्षीय महिला, खुलताबाद येथील ५८ वर्षीय महिला, हादियाबाद, गंगापूर येथील ६० वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ५० वर्षीय महिला, फुलंब्रीतील ५८ वर्षीय पुरुष, पैठण येथील ४१ वर्षीय पुरुष, वाळूज येथील ६० वर्षीय महिला, एन-१३ येथील ७० वर्षीय पुरुष, जयसिंगपुरा येथील ७९ वर्षीय पुरुष, एन-२ येथील ६६ वर्षीय महिला, येसगाव, खुलताबाद येथील ६० वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ८५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद ३, पडेगाव ३, मुकुंदवाडी १, एन-२ येथे २, जयभवानीनगर ४, हनुमाननगर १, एन-१ येथे ५, ठाकरेनगर १, देवळाई १, संभाजी कॉलनी २, एन-९ येथे १, शिवनेरी कॉलनी १, मेहमूदपुरा १, भवानीनगर १, एन-९ येथे ३, सहारा वैभव १, एन-४ येथे १, एन-११ येथे १, कांचनवाडी १, पैठण रोड १, शहानगर १, अथर्व क्लासजवळ १, सैनिक कॉलनी १, एन-१२ येथे १, हर्सूल २, फुलेनगर २, ज्योतीनगर १, हनुमान कॉलनी १, टी. व्ही. सेंटर रोड १, समर्थनगर १, एन-१३ येथे १, एन-६ येथे १, चिकलठाणा १, निशांत पार्क १, सिडको १, मेल्ट्रॉन डीसीएचसी १, कांचनवाडी १, नूर कॉलनी १, जाधववाडी १, अन्य ६.
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर ५, वाळूज १, इंद्रप्रस्थ कॉलनी १, रांजणगाव शेणपुंजी ३, डागेगाव ता. कन्नड १, कन्नड १, शिरसाळा तांडा, ता. सिल्लोड १, पालोद ता. सिल्लोड १, जोगेश्वरी २, कमलापूर १, गडलिंब ता. गंगापूर १, तीसगाव १, मेहकापूर १, पिशोर ता. कन्नड १, एन-३ येथे १, शेंद्रा एमआयडीसी, कुंभेफळ १, अन्य १४४.