CoronaVirus In Aurangabad : कोरोनाने शहरातील ५ तर ग्रामीणच्या २० रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 02:15 PM2021-05-07T14:15:27+5:302021-05-07T14:17:01+5:30
CoronaVirus In Aurangabad : सध्या जिल्ह्यात ९,३१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ९४६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ३२८, तर ग्रामीण भागामधील ६१८ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १,०५१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. ग्रामीण भागांत नव्या रुग्णांसह मृत्यूचा आलेखही वाढत आहे. गेल्या २४ तासांत औरंगाबाद शहरातील ५, ग्रामीण भागातील तब्बल २० रुग्णांचा मृत्यू झाला. त्याबरोबरच अन्य जिल्ह्यांतील १० रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या आता रोज एक हजाराखालीच राहत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सध्या ९,३१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २९ हजार ८४८ झाली आहे. आतापर्यंत १ लाख १७ हजार ८५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,६८३ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ५०२ आणि ग्रामीण भागातील ५४९ अशा १,०५१ रुग्णांना सुटी देण्यात आली.
उपचार सुरू असताना पैठण येथील ४६ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय पुरुष, खुलताबाद येथील ४८ वर्षीय पुरुष, कन्नड येथील २६ वर्षीय महिला, गजगाव, गंगापूर येथील ५५ वर्षीय पुरुष, शेलगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, मिसारवाडी येथील ४९ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७३ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ५५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ५८ वर्षीय महिला, वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, सिडकोतील ६६ वर्षीय महिला, बजाजनगरातील ६२ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ६५ वर्षीय महिला, हनुमंतखेडा, सोयगाव येथील ४२ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, मिसारवाडी येथील २७ वर्षीय पुरुष, एन-११ येथील ८१ वर्षीय महिला, जातेगाव, फुलंबी येथील ७३ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ४९ वर्षीय पुरुष, धूपखेडा येथील ५९ वर्षीय पुरुष, विरमगाव, फुलंब्री येथील ४५ वर्षीय पुरुष, टाकळी, गंगापूर येथील ५७ वर्षीय महिला, वरखेड, गंगापूर येथील ३१ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४५ वर्षीय महिला, ३६ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष, ६८ वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, ४९ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ५० वर्षीय महिला, बोरखेडा येथील ६३ वर्षीय पुरुष, जळगाव जिल्ह्यातील ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
सातारा परिसर ११, बीड बायपास १६, शिवाजीनगर ८, गारखेडा ७, मयूर पार्क १०, मिसारवाडी १, एन-५ येथे ४, एन-६ येथे ६, भोईवाडा २, केशवनगरी १, दलालवाडी १, खोकडपुरा १, मुकुंदवाडी २, पडेगाव ७, भावसिंगपुरा ६, उल्कानगरी २, समतानगर १, व्यंकटेश कॉलनी १, एन-१ येथे ४, एस.टी. कॉलनी १, एन-७ येथे १, अंबिकानगर १, रामनगर ३, एन-२ येथे ७, विश्रांतीनगर १, जयभवानीनगर ४, चिकलठाणा २, न्यू हनुमाननगर १, हर्सूल २, जाधववाडी २, न्यायनगर २, एन-४ येथे ५, नक्षत्रवाडी ७, कांचननगर २, शहानूरमियाँ दर्गा २, आलोकनगर २, एसआरपीएफ कॅम्प १, लक्ष्मी कॉलनी २, सूर्यादीपनगर १, लक्ष्मीनगर २, नाईकनगर १, आशानगर १, पुंडलिकनगर ४, चेतन घोडा १, देवळाई रोड १, हाउसिंग सोसायटी १, अशोकनगर १, जवाहर कॉलनी २, टी.व्ही. सेंटर २, राधास्वामी कॉलनी २, पहाडसिंगपुरा २, लेबर कॉलनी १, आंबेडकरनगर १, एन-८ येथे ३, सेव्हन हिल १, चेतनानगर १, बसैयेनगर २, मिलकॉर्नर २, एन-१० येथे १, बायजीपुरा १, एन-९ येथे २, चौधरी कॉलनी १, गजानननगर २, दिवाणदेवडी १, अजबनगर १, श्रेयनगर १, राहुलनगर १, देवळाई परिसर ६, अबरार कॉलनी १, पेठेनगर २, विष्णूनगर २, ज्युबिली पार्क २, विमानतळ २, उस्मानपुरा २, पद्मावती कॉलनी स्टेशन रोड १, एकनाथनगर १, बनेवाडी १, सिंधी कॉलनी १, न्यू लक्ष्मी कॉलनी १, ज्योतीनगर १, बन्सीलालनगर २, प्रतापनगर १, शाहनूरवाडी २, न्यू एसबीएच कॉलनी २, नंदनवन कॉलनी २, एमजीएम पीजी हॉस्टेल १, मिलिटरी हॉस्पिटल १, न्यू बालाजीनगर १, कांचनवाडी ३, अरिहंतनगर १, शिल्पनगर १, क्रांतीचौक १, मनजितनगर १, वेदांतनगर १, जटवाडा रोड १, अमृतसाई प्लाझा १, भाग्योदय सोसायटी १, एमआयटी कॉलेज १, सिव्हिल हॉस्पिटल १, भुजबळनगर १, घाटी २, एमजीएम हॉस्पिटल १, एन-११ येथे १, भगतसिंगनगर १, अन्य ९२.
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर १७, सिडको वाळूज महानगर- १ येथे ७, वडगाव कोल्हाटी १, जोगेश्वरी १, सिल्लोड २, रांजणगाव ४, पिसादेवी ५, दौलताबाद २, आडूळ, ता. पैठण २, पाचोड १, सालेगाव, ता. कन्नड १, खांडेवाडी १, वाळूज ४, बाळापूर १, भराडी, ता. सिल्लोड १, जडगाव करमाड १, जरंडी, ता. सोयगाव १, फुलंब्री १, डुबखेडा बिडकीन १, करमाड १, वैजापूर १, धूपखेडा २, गिरनार तांडा १, शेंद्रा १, शहापूर, ता. गंगापूर २, अन्य ५५६.