corona virus : औरंगाबादकरांनो काळजी घ्या; जिल्ह्याने पार केला १ लाख कोरोना रुग्णसंख्येचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 05:17 PM2021-04-13T17:17:18+5:302021-04-13T17:20:03+5:30

corona virus in Aurangabad : जिल्ह्यात सध्या १५,४५७ रुग्णांवर उपचार सुरू  

corona virus in Aurangabad : district surpasses 1 lakh corona virus patients | corona virus : औरंगाबादकरांनो काळजी घ्या; जिल्ह्याने पार केला १ लाख कोरोना रुग्णसंख्येचा आकडा

corona virus : औरंगाबादकरांनो काळजी घ्या; जिल्ह्याने पार केला १ लाख कोरोना रुग्णसंख्येचा आकडा

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी कोरोनाच्या १४९२ नव्या रुग्णांची वाढ, २७ मृत्यूउपचारानंतर दिवसभरात १,३९३ जणांना सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १,४९२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,३९३ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ तासांत २७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २३ आणि अन्य जिल्ह्यांतील ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,४५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता १ लाख १८४ झाली आहे, तर आतापर्यंत ८२ हजार ७२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २००४ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,४९२ रुग्णांत महापालिका हद्दीतील ७७७, तर ग्रामीण भागातील ७१५ रुग्णांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील ९०० आणि ग्रामीण ४९३, अशा १,३९३ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना ढाकेफळ, पैठण येथील ५३ वर्षीय पुरुष, पुंडलिकनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, नंदनवन कॉलनीतील ८० वर्षीय पुरुष, अंधारी, सिल्लोड येथील ४३ वर्षीय महिला, बेगमपुरा येथील ६७ वर्षीय महिला, पैठणगेट येथील ५२ वर्षीय पुरुष, गारखेड्यातील २८ वर्षीय पुरुष, बेगमपुरा येथील ४५ वर्षीय पुरुष, गोळेगाव, खुलताबाद येथील ६५ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ४५ वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ६५ वर्षीय महिला, परसोडा, वैजापूर येथील ७० वर्षीय महिला, लासूरगाव, वैजापूर येथील ६३ वर्षीय पुरुष, पैठण येथील ८२ वर्षीय पुरुष, गारज, वैजापूर येथील ८६ वर्षीय पुरुष, ढोरकीन, पैठण येथील ५४ वर्षीय पुरुष, पिंप्रीराजा वाणी येथील ४२ वर्षीय पुरुष, अजबनगर येथील ८९ वर्षीय पुरुष, समर्थनगर येथील ८१ वर्षीय पुरुष, एन-११ येथील ८२ वर्षीय पुरुष, खिंवसरा पार्क येथील ८४ वर्षीय पुरुष, एन-४ येथील ८६ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ७७ वर्षीय पुरुष आणि जालना जिल्ह्यातील आपेगाव, अंबड येथील ५० वर्षीय पुरुष, भोकरदन येथील ८० वर्षीय पुरुष, मंठा येथील ६० वर्षीय महिला, शेनगाव हिंगोली येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद १४, बीड बायपास १५, सातारा परिसर २५, गारखेडा परिसर ९, शिवाजीनगर ११, छत्रपतीनगर ५, टिळकनगर १, एन-५ येथे १०, एन-४ येथे १६, एन-११ येथे ५, काल्डा कॉर्नर १, एन-६ येथे १०, एन-१ येथे ५, एन-२ येथे ८, जवाहर कॉलनी ४, कुशलनगर १, बहादूरपुरा १, समतानगर २, कासलीवाल तारांगण १, फाजलपुरा १, पदमपुरा ५, एन-३ येथे ४, पन्नालालनगर १, शास्त्रीनगर २, तापडियानगर १, बेगमपुरा ३, हडको १, बन्सीलालनगर ५, पडेगाव ६, वाल्मी नाका २, पवननगर २, औरंगपुरा १, खोकडपुरा १, कॅनॉट प्लेस १, क्रांतीचौक ४, वेदांतनगर १, मिटमिटा १, दिशा संस्कृती ४, अदालत रोड १, खडकेश्वर २, जालना रोड १, एसबीएच कॉलनी १, बंजारा कॉलनी १, नवीन वस्ती १, उल्कानगरी १२, विश्रामबाग कॉलनी २, उस्मानपुरा ७, दशमेशनगर ४, मयूरबन कॉलनी २, रेल्वे स्टेशनमागे १, शिवकृपा कॉलनी १, सनी सेंटर १, लक्ष्मीनगर १, एकतानगर जटवाडा रोड १, भावसिंगपुरा ५, एन-१२ येथे ३, चिकलठाणा ९, मिसारवाडी १, विश्रांतीनगर २, जयभवानीनगर ८, ठाकरेनगर ६, रामनगर २, म्हाडा कॉलनी ६, विठ्ठलनगर १, मुकुंदवाडी ५, कामगार चौक ४, सुराणानगर १, सौजन्यनगर २, समर्थ हॉस्पिटल २, त्रिमूर्ती चौक ३, बुद्धनगर २, पुंडलिकनगर ३, आनंदनगर १, सिंधी कॉलनी १, पेठेनगर १, कृष्णानगर १, गजानन कॉलनी ३, रेणुकानगर १, स्वप्ननगरी २, विशालनगर ३, अशोकनगर २, काबरानगर २, राजेशनगर १, गजानननगर ९, शिवशंकर कॉलनी २, कल्याणनगर १, मयूर कॉलनी २, न्यू शांतिनिकेतन कॉलनी १, विजयनगर २, खिंवसरा पार्क १, स्वानंदनगर २, एस.टी. कॉलनी १, विष्णूनगर २, अलोकनगर ५, रवींद्रनगर १, हनुमाननगर २, भारतनगर १, निवृत्तीनगर २, सय्यदनगर १, रेणुकापुरम १, उत्तमनगर १, बाळकृष्णनगर २, नाथनगर २, हर्सूल ५, विश्वभारती कॉलनी २, देशमुखनगर १, अंगुरीबाग १, मंजूरपुरा १, एमजीएम सिडको १, सहकार बँक कॉलनी २, पिसादेवी रोड १, टी.व्ही. सेंटर १, कांचनवाडी ६, ज्योतीनगर ५, नवजीवन कॉलनी २, अयोध्यानगर १, राधास्वामी कॉलनी १, जाधववाडी १, गुलमोहर कॉलनी २, एन-७ येथे ९, एन-८ येथे ९, इंदिरानगर १, प्रतापनगर २, एन-९ येथे ३, होनाजीनगर ३, न्यू हनुमाननगर १, गजानन मंदिर १, घाटी २, बन्सीलालनगर १, जान्हवी रेसिडेन्सी १, आर.जे. इंटरनॅशनल स्कूल २, आयडिया हाऊस १, कासलीवाल मार्वल १, संग्रामनगर १, राधामोहन कॉलनी १, शाहनूरवाडी १, निशांत पार्क १, ईटखेडा ३, टाऊन सेंटर २, गादिया विहार १, शरयू रेसिडेन्सी १, शंकरनगर २, छावणी परिसर १, हर्सूल टी-पॉइंट २, भारतनगर १, मयूर पार्क ३, गुरुसहानीनगर १, बालाजीनगर २, सारा वैभव जटवाडा रोड १, किराडपुरा १, व्यंकटेशनगर ६, देवळाई रोड १, अंबिकानगर १, संजयनगर १, ब्ल्यू बेल्स हाऊसिंग सोसायटी १, सिंफनी कॉलनी १, शहाबाजार १, अंबर हिल १, वसंतनगर १, नाथपुरम १, सीएसएमएस १, मेहमूदपुरा २, न्यू पहाडसिंगपुरा १, आझाद कॉलेजसमोर १, देवळाई चौक १, मुरलीधरनगर १, नक्षत्रवाडी १, सुधाकरनगर ३, द्वारकानगर १, साईनाथनगर १, भारत माता कॉलनी १, तापडिया प्राइड १, पदमपुरा २, नंदनवन कॉलनी २, समर्थनगर ३, प्रकाशनगर १, कोकणवाडी १, एनआरएच घाटी १, देवानगरी १, जालाननगर २, राहुलनगर १, भुजबळनगर १, साईनगर २, सिल्कमिल कॉलनी २, पैठण रोड १, शंभूनगर १, भगतसिंगनगर १, सावरकरनगर १, दिशानगरी १, कासलीवाल इस्टेट १, दर्गा रोड १, नंदिग्राम कॉलनी १, श्रेयनगर १, सिडको २, गणेश कॉलनी १, मिलिट्री हॉस्पिटल १, लक्ष्मी कॉलनी १, अन्य २६६

ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर ३, सिडको वाळूज महानगर ३, कन्नड १, पैठण २, पोखरी २, ए.एस. क्लब १, रामनगर पिशोर, कन्नड १, रांजणगाव ३, गंगापूर १, शेंद्रा १, गेवराई १, सावंगी १, अंजनडोह ३, हर्सूल गाव १, शेवगाव १, शेवगा १, काचीवाडा १, जामवाडी तांडा १, आडगाव १, बोडखा खुलताबाद ३, डोईफोडा सिल्लोड १, पिंपळखुटा १, पाचोड १, लाडगाव १, आडगाव १, म्हाडा कॉलनी तीसगाव १, सिल्लोड १, रहाळपाटी तांडा १, पळशी १, अन्य ६९८.

Web Title: corona virus in Aurangabad : district surpasses 1 lakh corona virus patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.