Corona Virus in Aurangabad : ३९६ कोरोना रुग्णांची वाढ, ६५४ जणांना सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 12:01 PM2021-05-26T12:01:38+5:302021-05-26T12:03:04+5:30
Corona Virus in Aurangabad : जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार १३३ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ३३ हजार १५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३९६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६५४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले, तर गेल्या २४ तासांत १५ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १४ रुग्णांचा आणि अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ५ हजार १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार १३३ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ३३ हजार १५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,१०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ३९६ नव्या रुग्णांत शहरातील १५२, तर ग्रामीण भागातील २४४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २०० आणि ग्रामीण भागातील ४५४ अशा ६५४ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना कायगाव (गंगापूर) येथील ४५ वर्षीय पुरुष, बजाजनगर येथील ५३ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ६२ वर्षीय पुरुष, उत्तमनगर, जवाहर कॉलनीतील ६१ वर्षीय पुरुष, देवळाई रोड परिसरातील ८५ वर्षीय पुरुष, बजाजनगर येथील ८३ वर्षीय पुरुष, मंगेगाव (गंगापूर) येथील ३० वर्षीय पुरुष, साफेर, (वैजापूर) येथील ४३ वर्षीय महिला, त्रिवेणीनगर येथील ५१ वर्षीय पुरुष, मयूर पार्क येथील ६० वर्षीय पुरुष, बिडकीन (पैठण) येथील ६३ वर्षीय पुरुष, करंजखेडा (कन्नड) येथील ७१ वर्षीय महिला, सादात कॉलनीतील ७२ वर्षीय पुरुष, जटवाडा रोड परिसरातील ५२ वर्षीय महिला आणि अहमदनगर जिल्ह्यातील ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी परिसर ३, मुंकदवाडी ३, बीड बायपास ५, देवळाई परिसर ३, सातारा परिसर ३, चेतनानगर, हर्सुल १, रेणुकानगर, गारखेडा ३, सिडको २, पंचशिलनगर, किलेअर्क १, विजयनगर २, ज्योतीनगर १, पैठन गेटजवळ १, क्रांतीचौक पोलीसस्टेशन १, राजीवनगर, रेल्वेस्टेशन १, क्रांतीनगर १, श्रेयनगर १, पडेगाव, सुंदरनगर २, शांतीनिकेतन कॉलनी १, शिवशंकर कॉलनी १, जयभवानीनगर २, शंभुनगर १, पुंडलिकनगर १, दर्गा चौक २, गणेशनगर २, न्यु हनुमाननगर २, बायजीपुरा गल्ली नं-८ येथे १, कैलासनगर १, कासलीवाल क्लासिक तापडीयानगर १, जाधववाडी २, दिल्ली गेट १, आकाशवाणी १, हर्सुल, साई कॉलनी १, मयुरपार्क २, हडको, वानखेडेनगर १, हरीकृपानगर १, ज्योतीनगर २, जुनाबाजार १, भोईवाडा १, जटवाडा रोड १, सारा आकृती फेस -१ येथे १, एन-१२ येथे ३, एन-१३ येथे १, एन-४ येथे २, एन-२ येथे २, एन-७ येथे २, एन-११ येथे २,एन-८ येथे ३, अन्य ७३
ग्रामीण भागातील रुग्ण
फर्दापूर, ता. सोयगाव १, केऱ्हाळा ता. सिल्लोड १, नक्षत्रवाडी २, तीसगाव १, पिसादेवी ३, कांचनवाडी चेकपोस्ट ६, कर्णिकनगर, मिटमिटा १, गाडे पो. पिंपळगाव, ता. वैजापूर १, सिडको वाळूज महानगर १, मोहरा ता. कन्नड १, ता. कन्नड ४, मनुर, ता.वैजापूर २, उडमातांडा, ता.कन्नड १, कोळंबी, ता.कन्नड १, वाळूज, लाईननगर १, रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापुर ५, सिडको महानगर ५, बजाजनगर १०, लिंबेजळगाव १, वडगाव कोल्हाटी ३, अंबेलोहळ ता. गंगापूर १, देवगावरंगारी ता. कन्नड १, अन्य १९१