corona virus in Aurangabad : कोणतीही शंका असो मेसेज करा; गृह विलगीकरणातील रुग्णांचे व्हॉट्स ॲपद्वारे समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 06:48 PM2021-04-17T18:48:15+5:302021-04-17T18:49:42+5:30
रुग्णांवर उपचार व काळजी त्यांचे स्वत:चे मूळ डॉक्टर ज्यांनी त्यांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला आहे, तेच घेतील.
औरंगाबाद : गृह विलगीकरणात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या शंकांचे निरसन आणि समुपदेशन आता व्हॉटस् ॲपद्वारे निःशुल्क करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वार्धक्यशास्त्र विभागाच्या मदतीने हे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गृह विलगीकरण केलेल्या रुग्णांना काही अडचणी असतील, तर https://chat.whatsapp.com/K1YoFNluy5kAV2nNih3tWi या लिंकला कॉपी करून व्हॉटस् ॲप ग्रुपला सहभागी होऊ शकतात आणि मॅसेज टाकू शकतात. सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत डॉक्टरांना जसजसा वेळ मिळेल, तसे प्रश्नांना उत्तरे देण्यात येतील. रुग्ण या ग्रुपमध्ये दहा दिवसांपर्यंत सहभागी होऊ शकतात.
रुग्णांवर उपचार व काळजी त्यांचे स्वत:चे मूळ डॉक्टर ज्यांनी त्यांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला आहे, तेच घेतील. याव्यतिरिक्त रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांना काही माहिती हवी असल्यास, शंका निरसन करावयाचे असल्यास ते या ग्रुपवर केले जाईल. ज्यांना व्हॉटस् ॲप करणे शक्य नसेल किंवा लिंकद्वारे ग्रुपमध्ये सहभागी होता येत नाही, त्यांनी 09665986302, 09096540840, 09987528024, 09152126263, 08275303956 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.