Corona Virus: सावधान ! शहरात पुन्हा पसरतोय काेरोना, दोन दिवसांत ३२ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 05:41 PM2021-12-31T17:41:05+5:302021-12-31T17:42:35+5:30
Corona Virus in Aurangabad: वेगवेगळ्या भागात रुग्णांचे निदान , सध्या ६१ रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी १६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील १४ आणि ग्रामीण भागातील २ रुग्णांचा समावेश आहे. शहरात वेगवेगळ्या भागात रुग्णांचे निदान होत आहे (Corona Virus in Aurangabad) . त्यामुळे कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरवत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात बुधवारीही १६ रुग्णांचे निदान झाले होते. जिल्ह्यात ७ दिवसांपूर्वी अवघ्या दोन रुग्णांचे निदान झाले होते. परंतु नव्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. जिल्ह्यात गुरुवारी १२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील १० आणि ग्रामीण भागातील २ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार १०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४९ हजार ८२० झाली आहे. आतापर्यंत एकूण ३६५१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मनपा हद्दीतील रुग्ण
महेशनगर १, व्यंकटेशनगर १, उस्मानपुरा १, कांचनवाडी १, बीड बायपास १, सातारा परिसर १, ज्योतीनगर १, सहकारनगर १, अन्य ६
ग्रामीण भागातील रुग्ण
वैजापूर १, पैठण १
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती
तारीख- नवे रुग्ण
२४ डिसेंबर-२
२५ डिसेंबर-९
२६ डिसेंबर-१२
२७ डिसेंबर-४
२८ डिसेंबर-९
२९ डिसेंबर-१६
३० डिसेंबर-१६