Corona Virus : दिलासा ! शहरात ११, ‘ग्रामीण’मध्ये १४ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 01:55 PM2021-07-05T13:55:41+5:302021-07-05T13:56:07+5:30

Corona Virus : औरंगाबाद शहरात अवघ्या ४० तर ग्रामीण भागात ४९२ कोरोना रुग्णांवर उपचार

Corona Virus: Comfort! An increase of 11 corona patients in urban areas and 14 in rural areas | Corona Virus : दिलासा ! शहरात ११, ‘ग्रामीण’मध्ये १४ कोरोना रुग्णांची वाढ

Corona Virus : दिलासा ! शहरात ११, ‘ग्रामीण’मध्ये १४ कोरोना रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देउपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात कोरोनाच्या २५ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील ११ तर ग्रामीण भागातील १४ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना, तीन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ५३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागांतील ४९२ रुग्णांवर तर शहरात अवघ्या ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेले काही दिवस ग्रामीण भागांत दररोज ५० पेक्षा अधिक रुग्णांचे निदान होत होते, परंतु ग्रामीण भागात आढळणाऱ्या नव्या रुग्णांत आता मोठी घट झाली आहे. रुग्णसंख्या १५ खाली आली. त्यामुळे शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील स्थितीविषयी दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४६ हजार ३९९ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४२ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १३ आणि ग्रामीण भागातील ८३ अशा ९६ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना, म्हस्की, वैजापूर येथील ५० वर्षीय पुरुष, गारखेड्यातील ६७ वर्षीय महिला, किनगाव, फुलंब्री येथील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.


मनपा हद्दीतील रुग्ण :
पडेगाव १, टाऊन हॉल, सिडको १, हर्सूल १, घाटी १, गारखेडा २, शहानूरवाडी १, इटखेडा १, अन्य ३
ग्रामीण भागातील रुग्ण :
औरंगाबाद तालुक्यात १, फुलंब्री १, गंगापूर १, कन्नड २, खुलताबाद १, वैजापूर ३, पैठण ५
 

Web Title: Corona Virus: Comfort! An increase of 11 corona patients in urban areas and 14 in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.