corona virus : दिलासादायक ! शहरात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 12:26 PM2021-04-24T12:26:02+5:302021-04-24T12:28:13+5:30

corona virus : दिवसभरात औरंगाबाद शहर हद्दीत कोरोनाचे ५९९ नवे रुग्ण आढळले तर ८०० रुग्ण कोरोनामुक्त झाले.

corona virus : Comfortable! There are more corona-free patients in the city than corona patients | corona virus : दिलासादायक ! शहरात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

corona virus : दिलासादायक ! शहरात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात दिवसभरात १४९६ कोरोना रुग्णांची भरउपचार सुरु असताना दिवसभरात २७ रुग्णांचा मृत्यू जिल्ह्यात उपचारानंतर १३१२ जणांना सुटी सध्या जिल्ह्यात एकूण १५,१७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी १४९६ रुग्णांची नव्याने भर पडली, तर २७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात औरंगाबाद शहर हद्दीत कोरोनाचे ५९९ नवे रुग्ण आढळले तर ८०० रुग्ण कोरोनामुक्त झाले. ग्रामीण भागात नवे ८९७ रुग्ण आढळले, तर ५१२ रुग्ण घरी परतले. जिल्ह्यात एकूण १३१२ बाधित उपचार पूर्ण झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.

आतापर्यंत एक लाख १५ हजार ९९१ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ९८ हजार ५१९ कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत एकूण २३०२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १५ हजार १७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. गेला आठवड्याभरात ग्रामीण भागातील रुग्णवाढ शहरापेक्षा अधिक संख्येने असून, शहराच्या शेजारील संसर्ग आतील गावांपर्यंत पोहोचल्याने चिंता व्यक्त होत आहे. शहरात ५९९, तर ग्रामीण मध्ये ८९७ रुग्ण आढळून आले तर सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या वैजापूर तालुक्यात १८५२, तर औरंगाबाद तालुक्यात १६३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंगापूर तालुक्यामध्ये शुक्रवारी सर्वाधिक २०२ रुग्ण आढळून आले.

मनपा हद्दीत ५९९ रुग्ण
घाटी परिसर ३, लक्ष्मी कॉलनी २, एन-६ सिडको ६, सातारा परिसर १७, पडेगाव ८, गारखेडा ८, कुंदवाडी १०, रामनगर ३, हडको २०, एन-५ येथे सिडको १, एन-७ येथे सिडको ६, एन-३ सिडको २, सिडको एन-२ येथे ४, एन-१ येथे सिडको ३, एन-८ येथे ४, एन-४ सिडको १०, जवाहर कॉलनी ३, सौजन्य नगर २, चिकलठाणा ८, एन-१ सिडको ३, भवानीनगर २, बेगमपुरा ३, मयूर पार्क ११, एसबीआय झोनल ऑफिस १, एन-११ सिडको १, भावसिंगपुरा ३, जयनगर १, जाधववाडी २, जडवाडा रोड ६, छावणी १, जयभीमनगर १, सिल्कमिल कॉलनी १, आदर्श नगर २, शहानूरवाडी ८, बन्सीलालनगर ३, आदिनाथनगर पैठण १, पीर बाजार १, दशमेश नगर २, खोकडपुरा १, सहकारनगर १, शाहगंज १, वॉकिंग प्लाझा १, बीड बाय पास २०, न्यायनगर ५, नक्षत्रवाडी २, उस्मानपुरा २, गुलमंडी २, पदमपुरा ३, समृद्धी पार्क १, कांचनवाडी ६, बायजीपुरा १, भारतनगर २, फुलेनगर १, आमीर नगर १, निशांत पार्क १, सुधाकरनगर ३, देवळाई परिसर ७, राहुलनगर १, छत्रपतीनगर १, होनाजीनगर २, गजानन नगर ४, गारखेडा ९, जयभवानीनगर ११, अन्य १, माळीवाडा १, गारखेडा परिसर १, नंदनवन कॉलनी ३, खडकेश्वर १, खाराकुँआ १, विजय कॉलनी १, राठी संसार पिसादेवी ३, औरंगपुरा २, समर्थनगर ३, तापडीयानगर १, चैतन्यनगर १, जालाननगर २, मेडिकल कॉलनी २, सराफा रोड १, श्रद्धा कॉलनी १, हिरापूर २, रामनगर १, महालक्ष्मी कॉलनी २, ज्ञान नगर १, राजमातानगर २, सारानगर १, विश्रांतीनगर १, प्रभू नगर १, हनुमाननगर २, कामगार चौक १, म्हाडा कॉलनी १, गादीया विहार ४, ब्रिजवाडी १, बालाजीनगर ३, विजयनगर ३, गुरुदत्तनगर १, शंभू नगर १, उत्तम नगर १, अरिहंत नगर २, खिंवसरा पार्क १, पुंडलिक नगर २, विशालनगर २, विष्णूनगर १, शिवाजीनगर ३, योगेश्वरी २, स्वराजनगर १, दर्गा चौक २, टाऊन सेंटर १, विद्यानगर १, शिवाजी हायस्कूल १, उल्का नगरी ६, सिंधी कॉलनी ३, श्रीनगर १, भूषणनगर १, देशमुखनगर १, सारंग सोसायटी १, हर्सूल ५, भडकल गेट २, रोशन गेट १, किले अर्क १, मकाई गेट २, पिसादेवी ७, सुरेवाडी १, रोझाबाग १, सावंगी २, बायजीपुरा ५, त्रिवेणी नगर १, एन-९ एम-२ येथे २, अशोक नगर १, विठ्ठल नगर १, पैठण गेट परिसर १, नारेगाव २, बाबा पेट्रोल पंप परिसर १, सावंगी १, इंद्रायणी हॉस्टेल १, टाऊन सेंटर १, एपीआय कॉर्नर , अन्य १९०

                        ‍
ग्रामीण ८९७
अतेगाव १, पोखरी १, कन्नड ५, गंगापूर २, वैजापूर ४, लोहगाव १, पैठण १, सोयगाव १, जानेफळ १, फुलंब्री २, रांजणगाव १, करमाड १, खुलताबाद २, पैठण १, लासूर १, गिरनार तांडा १, डोनगाव ३, झाल्टा फाटा २, सिल्लोड २, विटखेडा १, एमआयडीसी २, बजाजनगर १, अन्य ८६०.

बाधितांचे २७ मृत्यू
घाटी रुग्णालयात ६५ वर्षीय पुरुष, नंदनवन कॉलनी, ६२ वर्षीय महिला सिल्लोड, ६५ वर्षीय पुरुष बजाजनगर, ३० वर्षीय महिला रामनगर, ४६ वर्षीय महिला भडकलगेट, ४० वर्षीय पुरुष बिलोनी, ९५ वर्षीय महिला वडगाव कोल्हाटी, ७० वर्षीय महिला खांडी पिंपळगाव, ५० वर्षीय महिला नागद, ७५ वर्षीय पुरुष बोडखा, ७५ वर्षीय पुरुष सिडको, ४० वर्षीय पुरुष जगदंबा लाॅन्सजवळ वैजापूर, ६४ वर्षीय पुरुष एन ३ सिडको, ३५ वर्षीय पुरुष बिलोली, ६३ वर्षीय पुरुष वसई, ८५ वर्षीय पुरुष मोंढा, ४५ वर्षीय महिला मंडी मार्केट खुलताबाद, ५७ वर्षीय पुरुष बीड बायपास, ३० वर्षीय महिला हळदा, ५० वर्षीय महिला वांजरगाव, ६९ वर्षीय महिला जटवाडा, जिल्हा सामान्य रुग्णालयात ८५ वर्षीय महिला मंगरूळ, ६३ वर्षीय महिला हनुमंतखेडा, ६७ वर्षीय पुरुष गुरुदत्त नगर, तर खासगी रुग्णालयात ५० वर्षीय महिला गारखेडा, ४५ वर्षीय पुरुष सिल्क मिल काॅलनी, ५२ वर्षीय पुरुष रोजाबाग येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: corona virus : Comfortable! There are more corona-free patients in the city than corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.