CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा विस्फोट, तब्बल २७ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 08:17 PM2020-04-27T20:17:57+5:302020-04-27T20:19:13+5:30

शहरातील रुग्ण संख्या ८३ वर

Corona virus: Corona blast in Aurangabad, 27 positive,total 83 patients in city | CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा विस्फोट, तब्बल २७ जण पॉझिटिव्ह

CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा विस्फोट, तब्बल २७ जण पॉझिटिव्ह

googlenewsNext

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा धोका कितीतरी पटीने वाढला आहे. तब्बल एकाच वेळी २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.शहरातील रुग्ण संख्या ८३ वर गेेली आहे.

शहरात सलग ९ व्या दिवशी सोमवारी कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. भीमनगर, भावसिंगपुरा येथील १६ वर्षीय मुलगी, नुर कॉलनीतील ५ वर्षीय मुलगा आणि किलेअर्क येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल सोमवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे सर्व किलेअर्क , आसेफिया कॉलनी आणि नूर कॉलनी येथील रहिवासी आहेत, अशी माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे विभागीय मंडळाचे नोडल ऑफिसर डॉ. गणेश कल्याणकर यांनी दिली. नागरिकांनी घरात राहणे, मास्क वापरावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Corona virus: Corona blast in Aurangabad, 27 positive,total 83 patients in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.