औरंगाबादकरांनो काळजी घ्या ! जिल्ह्यात कोरोना मृत्यूसत्र थांबले, पण नव्या रुग्णांत मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 01:28 PM2022-01-12T13:28:14+5:302022-01-12T13:30:44+5:30
Corona Virus in Aurangabad : तब्बल १४२६ जणांवर उपचार सुरू आहेत. तर नव्या रुग्णात सर्वाधिक शहरातील आहेत
औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या ६ दिवसांत एकाही (Corona Virus in Aurangabad ) कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, परंतु कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये रोज मोठी वाढ होते आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३४९ नव्या रुग्णांची भर पडली. यात सर्वाधिक रुग्ण हे शहरातील आहेत.
नव्या रुग्णांमध्ये शहरातील २८५ आणि ग्रामीण भागातील ६४ रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी दिवसभरात ६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात शहरातील ५८ आणि ग्रामीणमधील ६ रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी ३२ रुग्ण बरे झाले होते. एकाच दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली. आतापर्यंत १ लाख ४६ हजार ४४८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. सध्या १,४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात ५ जानेवारी रोजी दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. परंतु त्यानंतर गेल्या ६ दिवसांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे.
मनपा हद्दीतील रग्ण
घाटी परिसर २, बन्सीलालनगर २, सिंधी कॉलनी १, चेतनानगर १, कांचनवाडी १, पैठण रोड ३, औरंगपुरा १, उस्मानपुरा १, भावसिंगपुरा १, पडेगाव ३, ज्योतीनगर १, प्रतापनगर १, एन-३ येथे १, रामनगर १, विमानतळ परिसर १, कंधारकर हॉस्पिटल परिसर १, सईदा कॉलनी १, नंदनवन कॉलनी १, गौतमनगर १, शहानुरवाडी १, आरेफ कॉलनी १, सिडको एन-पाच येथे २, एन- वन येथे १, हडको एन-बारा येथे १, अन्य २५४.
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद १६, फुलंब्री ५, गंगापूर १४, कन्नड २, खुलताबाद २, सिल्लोड ८, वैजापूर ५, पैठण ५, सोयगाव ७.