Corona Virus : चिंताजनक ! शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोना रुग्ण दुप्पट, जिल्ह्यात सध्या ५२७ रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 04:49 PM2022-01-08T16:49:50+5:302022-01-08T16:55:09+5:30

corona virus : जिल्ह्यात १८३ नव्या रुग्णांची वाढ : शहरात दीडशेपार रुग्ण, ५२७ रुग्णांवर उपचार सुरू

Corona Virus: corona patients in rural areas are doubled as in Aurangabad City | Corona Virus : चिंताजनक ! शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोना रुग्ण दुप्पट, जिल्ह्यात सध्या ५२७ रुग्णांवर उपचार सुरू

Corona Virus : चिंताजनक ! शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोना रुग्ण दुप्पट, जिल्ह्यात सध्या ५२७ रुग्णांवर उपचार सुरू

googlenewsNext

औरंगाबाद : शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागात कोरोनाने (corona virus ) हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या चार दिवसात ग्रामीण भागात नव्या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात १८३ रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील तब्बल १५१ आणि ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी २८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात शहरातील २४ आणि ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार २८५ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात सध्या ५२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात चार दिवसांपूर्वी २४ तासांत १६ रुग्णांचे निदान झाले होते. शुक्रवारी ३२ रुग्ण वाढले. शहरातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढ होत असून, नव्या रुग्णांची संख्या दीडशेपार गेली आहे.

मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी होस्टेल २, खडकेश्वर १, घाटी १, मिल्ट्री हॉस्पिटल १, रेल्वे स्टेशन १, संभाजी कॉलनी १, शिवकृपा कॉलनी १, ईटखेडा २, मकाई गेट १, नंदनवन कॉलनी १, वसुंधरा कॉलनी २, न्यू पहाडसिंगपुरा १, एन- वन येथे २, रामनगर १, करीम कॉलनी १, व्यंकटेशनगर १, कटकट गेट १, जाधववाडी १, एन- पाच येथे २, पिसादेवी १, एन- सात येथे ३, ज्योतीनगर १, हनुमाननगर १, आकाशवाणी १, गारखेडा परिसर २, समर्थनगर १, छत्रपतीनगर १, एमआयटी कॉलेज १, सातारा परिसर १, वेदांतनगर १, एसबी कॉलनी १, बीड बायपास २, गादिया विहार २, देवगिरी गर्ल्स होस्टेल १, श्रेयनगर ३, नंदनवन कॉलनी १, छावणी १, शिवाजीनगर १, जवाहर कॉलनी १, त्रिमूर्ती चौक १, गजानन कॉलनी १, एन- चार येथे ४, ठाकरेनगर १, हर्सूल १, सिडको टाऊन सेंटर १, एअरपोर्ट स्टाफ १, रामनगर १, शहानूरवाडी १, क्रांती चौक १, कोकणवाडी १, बन्सीलाल नगर १, टिळकनगर १, कमलनयन बजाज हॉस्पिटल परिसर ४, रोशन गेट १, समर्थनगर २, कांचनवाडी १, महूनगर १, अन्य ७५.

ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगबाद ११, फुलंब्री ४, गंगापूर ४, कन्नड ४, खुलताबाद १, सिल्लोड १, वैजापूर ३, पैठण ४

ग्रामीण भागातील स्थिती
तारीख-नवे रुग्ण
१ जानेवारी-१०
२ जानेवारी-७
३ जानेवारी-८
४ जानेवारी-१६
५ जानेवारी-१७
६ जानेवारी-१७
७ जानेवारी-३२

Web Title: Corona Virus: corona patients in rural areas are doubled as in Aurangabad City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.