Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात सध्या २,४०० रुग्णांवर कोरोना उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 11:37 AM2021-06-07T11:37:35+5:302021-06-07T11:39:17+5:30

Corona Virus : रविवारी जिल्ह्यात उपचारानंतर २९५ जणांना सुटी 

Corona Virus: currently being treated on 2,400 corona patients in Aurangabad district | Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात सध्या २,४०० रुग्णांवर कोरोना उपचार सुरू

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात सध्या २,४०० रुग्णांवर कोरोना उपचार सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात ४०, ग्रामीणमध्ये ९९ कोरोना रुग्णांची वाढउपचारादरम्यान १५ रुग्णांचा मृत्यू 

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या दोनशेखाली गेली. दिवसभरात १३९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ४०, तर ग्रामीण भागातील ९९ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यांतील ४ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ८०३ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३८ हजार १३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ९८ आणि ग्रामीण भागातील १९७, अशा २९५ रुग्णांना सुटी देण्यात आली.
उपचार सुरू असताना कांचनवाडी येथील ६६ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६४ वर्षीय महिला, रांजणगाव येथील ३७ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६८ वर्षीय महिला, कन्नड येथील ५७ वर्षीय पुरुष, तसेच ६१ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, सटाना, वैजापूर येथील ७५ वर्षीय महिला, जांभई, सिल्लोड येथील ४८ वर्षीय महिला, टिळकनगर येथील ४७ वर्षीय पुरुष, एन-६ येथील ५७ वर्षीय पुरुष आणि लातूर जिल्ह्यातील ६५ वर्षीय पुरुष, बुलडाणा जिल्ह्यातील ४८ वर्षीय पुरुष, ताडेगाव येथील ५० वर्षीय पुरुष, अमाडी कोठारी, चंद्रपूर येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
विष्णुनगर १, खोकडपुरा १, मिलिटरी हॉस्पिटल १, सादतनगर २, छावणी १, सहकारनगर १, गजानननगर २, आर्यनगर १, देशमुखनगर १, चिकलठाणा २, तारांगणनगर २, मुकुंदवाडी २, हर्सुल १, मयूर पार्क २, कांचनवाडी १, सातारा परिसर ३, म्हाडा कॉलनी १, पडेगाव १, सिध्दार्थनगर १, एन-२ येथे १, औरंगाबाद १२.

ग्रामीण भागातील रुग्ण
वैजापूर १, वडगाव कोल्हाटी १, वाळूज १, वाळूज एमआयडीसी १, सिल्लोड १, बजाजनगर ४, तीसगाव १, अन्य ८९.

Web Title: Corona Virus: currently being treated on 2,400 corona patients in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.