Corona Virus : घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 03:10 PM2022-01-06T15:10:39+5:302022-01-06T15:12:20+5:30

Corona Virus: औरंगाबादेत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे.

Corona Virus: Dean of Ghati Hospital found Corona positive | Corona Virus : घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह

Corona Virus : घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह

googlenewsNext

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे- कागीनाळकर या  कोरोनाबाधित (Corona Virus) असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, औरंगाबादेत कोरोनाचा ( Corona Virus In Aurangabad ) फैलाव झपाट्याने होत असून, बुधवारी औरंगाबाद शहरात १०३ नव्या रुग्णांची, तर ग्रामीण भागात १७ रुग्णांची वाढ झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. रुग्णांच्या उपचाराच्या सोयी सुविधा वाढवण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये घाटी रुग्णालयात एक हजार खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. उपचार सोयी-सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने डॉ. रोटे या गेल्या अनेक दिवसांपासून परिश्रम घेत होत्या. दोन दिवसापूर्वी घाटीत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून आढावा घेतला होता.

शहरात कोरोना रुग्ण शंभरीपार
औरंगाबादेत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, बुधवारी औरंगाबाद शहरात १०३ नव्या रुग्णांची, तर ग्रामीण भागात १७ रुग्णांची वाढ झाली. दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मंगळवारी १०३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, सर्वसामान्य नागरिक हादरून गेले. मात्र, हीच रुग्णसंख्या बुधवारी एकट्या औरंगाबाद शहराने गाठली. २० रुग्ण बुधवारी बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार २२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ५० हजार १५९ झाली आहे. एकूण ३६५८ जणांचा मृत्यू झाला आहे. २७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना मिसारवाडी येथील ४५ वर्षीय पुरुष आणि वैजापूर तालुक्यातील ७३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
क्रांती चौक १, विजय नगर १, उल्कानगरी १, बीड बायपास ७, एन-चार येथे ३, घाटी परिसर १, गुलमंडी १, गजानन महाराज मंदिर १, एन-बारा येथे १, बाबर कॉलनी १, देवळाई चौक २, रेल्वे स्टेशन परिसर ३, आर्मी कॅम्प छावणी १, एन-आठ येथे १, एन-दोन येथे २, सातारा परिसर १, मुकुंदवाडी १, सहकारनगर १, एन-पाच येथे १, एन-सहा येथे २, शिवाजीनगर २, कांचनवाडी २, सिटी चौक १, वेदांतनगर १, खडकपुरा हनुमान मंदिर चौक १, इटखेडा ४, सूतगिरणी चौक १, प्रतापनगर १, देशमुखनगर १, सिंधी कॉलनी १, बन्सीलालनगर १, गारखेडा १, जाधववाडी १, हर्सूल १, कटकट गेट १, अन्य ५०

ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद ७, गंगापूर १, कन्नड १, खुलताबाद १, वैजापूर ६, सोयगाव १

Web Title: Corona Virus: Dean of Ghati Hospital found Corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.