Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात १९३ कोरोना रुग्णांची वाढ, १८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 01:09 PM2021-06-05T13:09:52+5:302021-06-05T13:11:03+5:30

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ४५३ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३७ हजार ५३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Corona Virus: An increase of 193 corona patients, 18 deaths in Aurangabad district | Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात १९३ कोरोना रुग्णांची वाढ, १८ मृत्यू

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात १९३ कोरोना रुग्णांची वाढ, १८ मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देउपचारानंतर ३८५ जणांना सुटी २,६७५ रुग्णांवर सुरु उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्या दोनशेच्या उंबरठ्यावरच राहिली. दिवसभरात १९३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ५७, तर ग्रामीण भागातील १३६ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २ हजार ६७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ४५३ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३७ हजार ५३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १५० आणि ग्रामीण भागातील २३५, अशा ३८५ रुग्णांना सुटी देण्यात आली.

१८ बाधितांचे मृत्यू
उपचार सुरु असताना फुलंब्रीतील ६५ वर्षीय पुरुष, पिसादेवी येथील ४० वर्षीय पुरुष, एन-८ येथील ४८ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ६० वर्षीय पुरुष, कन्नड येथील ३० वर्षीय महिला, न्यू हनुमाननगर येथील ७१ वर्षीय पुरुष, पिसादेवी येथील ६५ वर्षीय पुरुष, निंबोरा, सोयगाव येथील ४८ वर्षीय पुरुष, एन-६ येथील ७२ वर्षीय महिला, हर्सूल परिसरातील ४२ वर्षीय पुरुष, अरिहंतनगर येथील ३८ वर्षीय पुरुष,सह्याद्रीनगर येथील ६० वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४५ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ५८ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ७५ वर्षीय महिला, हिंगोली जिल्ह्यातील ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील ५७ रुग्ण
बीड बायपास ४, सातारा परिसर १, शिवाजी नगर १, गारखेडा परिसर ३, घाटी १, पडेगाव १, भोईवाडा १, जाधववाडी १, पुंडलिकनगर १, शेंद्रा एमआयडीसी १, देवळाई १, संजय नगर १, नाथप्रांगण १, विश्रांतीनगर १, चिकलठाणा २, देवळाई चौक १, गणेश नगर १, चिकलठाणा १, मुकुंदवाडी १, एन-५ येथे १, ओहर १, पटेल प्लॅनेट जटवाडा १, एन-८ येथे १, न्यू पहाडसिंगपुरा २, आंबेडकरनगर बायजीपुरा १, ब्रिजवाडी १, शिंदे हॉस्पिटल १, एन-७ येथे १, एन-६ येथे १, पदमपुरा १, कांचनवाडी १, अन्य १९

ग्रामीण भागातील १३६ रुग्ण
बजाजनगर ३, मनजीत प्राईड सिडको वाळूज महानगर-१ येथे १, रांजणगाव एमआयडीसी वाळूज १, आडगाव २, करोडी २, कमलापूर ता.गंगापूर १, गंगापूर १, जोगेश्वरी १, अन्य १२४ बाधित रुग्ण शुक्रवारी आढळून आले.

Web Title: Corona Virus: An increase of 193 corona patients, 18 deaths in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.