corona virus : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी २४७ कोरोना रुग्णांची वाढ, २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 01:37 PM2021-02-27T13:37:14+5:302021-02-27T13:38:37+5:30

corona virus जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ हजार ८१३ झाली असून, आजपर्यंत ४६, ८५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत

corona virus : An increase of 247 corona patients, 2 deaths in Aurangabad district on Friday | corona virus : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी २४७ कोरोना रुग्णांची वाढ, २ मृत्यू

corona virus : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी २४७ कोरोना रुग्णांची वाढ, २ मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या १६९१ रुग्णांवर उपचार सुरूशुक्रवारी उपचारानंतर ६५ जणांना मिळाली सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी २४७ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली तर २ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ६५ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने शहरातील ५० तर ग्रामीणमधील १५ जणांना सुटी देण्यात आली.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ हजार ८१३ झाली असून, आजपर्यंत ४६, ८५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले तर एकूण १२६४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने १६९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

२ बाधितांचा मृत्यू
शहरातील खासगी रुग्णालयात बीड बायपास रोडवरील ५५ वर्षीय पुरुष आणि टाइम्स कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीत २२० रुग्ण
भानूदास नगर १, एन-१ येथे २, टाऊन हॉल १, निराला बाजार १, भावसिंगपुरा १, ज्योतीनगर ४, सेव्हन हिल २, म्हाडा कॉलनीजवळ धूत हॉस्पिटल १, गारखेडा परिसर ८, पडेगाव ५, एम-२ हडको २, बंजारा कॉलनी १, मुकुंदवाडी १, संत तुकाराम नगर २, दशमेश नगर १, जाधववाडी ३, सातारा परिसर ५, उस्मानपुरा ९, वेदांत नगर ४, जिव्हेश्वर कॉलनी १,महावीर चौक १, शास्त्रीनगर १, गजानन कॉलनी २, उल्का नगरी १, शिवाजीनगर १, कैलासनगर २, आकाशवाणी १, चिकलठाणा ५, भाग्योदय कॉलनी १, मुथीयन सोसायटी २, नाईक नगर १, छत्रपती नगर १, सूतगिरणी चौक २, मेबन कॉलनी १, देवळाई चौक ६, शहानूरवाडी २, जटवाडा रोड परिसर १, राधास्वामी कॉलनी १, एन-२ सिडको १, मोरया पार्क १, जिजामाता कॉलनी १, जयभवानी नगर १, सातारा परिसर २, बालाजी नगर २, एन-४ सिडको ४, दर्गा रोड परिसर १, एसबी कॉलनी २, सुयोग हौ.सो १, ज्ञानेश्वर नगर १, टाऊन सेंटर १, जालान नगर ४, एसबीएच कॉलनी ३, गोळेगावकर कॉलनी २, नाथ व्हॅली १, मिटमिटा १, श्रेय नगर १, सिल्क मिल्क कॉलनी १, छोटा मुरलीधर नगर १, कॅनॉट १, स्पोर्ट ॲथॅरिटी आॅफ इंडिया १, वानखेडे नगर १, एन-५ सिडको ४, सिडको महाजन कॉलनी १, एन-2 सिडको १, पुष्प नगर १, सारा राज नगर १, गुरु प्रसाद नगर १, विद्या नगर २, भावसिंगपुरा ३, एन-१ सिडको १, शेंद्रा एमआयडीसी १, शिवराज कॉलनी १, नंदनवन कॉलनी १, एन-७ सिडको १, पिसादेवी १, हॉटेल अतिथी परिसर १, पारिजात नगर १, यशोधरा कॉलनी २, टिळक नगर २, समता नगर १, हनुमान नगर १, सिल्कमिल कॉलनी १, जे जे पल्स हॉस्पीटल १, जटवाडा परिसर १, एन-२ सिडको १, म्हाडा कॉलनी १, समर्थ नगर २, पैठण रेाड १, चिंतामणी कॉलनी १, बाबा पेट्रोलपंप १, गुलमंडी १,पदमपुरा १, कांचनवाडी २, जवाहर कॉलनी २, अहिंसा कॉलनी १, चेतक चौक १, एन-६ येथे १, अन्य ५२

ग्रामीण भागात २७ रुग्ण
करमाड २, फुलंब्री ६, सिल्लोड १, कन्नड १,बजाज नगर ३, तीसगाव १, वडगाव २, पंढरपूर १, रांजणगाव १, अन्य ९ रुग्ण बाधित आढळून आले.
 

Web Title: corona virus : An increase of 247 corona patients, 2 deaths in Aurangabad district on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.