Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ३२६ कोरोना रुग्णांची वाढ, २२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 12:17 PM2021-05-25T12:17:49+5:302021-05-25T12:18:44+5:30

Corona Virus: जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ७३७ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ३२ हजार ३६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Corona Virus: Increase of 326 corona patients in Aurangabad district, 22 deaths | Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ३२६ कोरोना रुग्णांची वाढ, २२ मृत्यू

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ३२६ कोरोना रुग्णांची वाढ, २२ मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देउपचारानंतर ५८१ रुग्णांना सुटी  जिल्ह्यात ५,२८४ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ३२६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ५८१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले, तर गेल्या २४ तासांत २२ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७ रुग्णांचा, अन्य जिल्ह्यांतील ५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ५ हजार २८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ७३७ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ३२ हजार ३६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,०९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ३२६ नव्या रुग्णांत शहरातील १२१, तर ग्रामीण भागातील २०५ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १९५ आणि ग्रामीण भागातील ३८६ अशा ५८१ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना आमसरी, सिल्लोड येथील ७५ वर्षीय पुरुष, नूर कॉलनी, सिल्लोड येथील ४२ वर्षीय पुरुष, फतियाबाद येथील ६० वर्षीय पुरुष, नक्षत्रवाडीतील ६८ वर्षीय पुरुष, पाडळी, पैठण येथील ५१ वर्षीय पुरुष, किराडपुरा येथील ६५ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ८५ वर्षीय महिला, शेळगाव, कन्नड येथील ६५ वर्षीय महिला, मोंढा तांडा, कन्नड येथील ४० वर्षीय पुरुष, बजाजनगरातील ३२ वर्षीय महिला, भीमनगर-भावसिंगपुरा येथील ७३ वर्षीय महिला, शरणापूर येथील ७३ वर्षीय पुरुष, पैठण येथील ६५ वर्षीय पुरुष, पिंपळवाडी, पैठण येथील ३१ वर्षीय पुरुष, एन-८ येथील ८१ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ४१ वर्षीय पुरुष, बन्सीलालनगर येथील ६० वर्षीय पुरुष आणि जळगाव येथील ६० वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ६० वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुष, ८० वर्षीय पुरुष, नाशिक जिल्ह्यातील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
सातारा परिसर ५, बीड बायपास ८, शिवाजीनगर २, गारखेडा परिसर १, राजाबाजार १, एन-६ येथे १, विजयनगर १, जवाहर कॉलनी १, आकाशवाणी १, कांचनवाडी १, राजीवनगर २, अमृतसाई प्लाझा १, पुष्पनगरी १, सिंधी कॉलनी २, मयूरपार्क १, एन-९ येथे १, पोलीस क्वाॅर्टर, मिलकॉर्नर १, हर्सूल २, गणेशनगर १, एस. टी. कॉलनी १, समर्थनगर १, संतोषीमातानगर १, जयभवानीनगर ३, मुकुंदवाडी २, पडेगाव ३, एन-१२ येथे १, एन-८ येथे ५, एन-७ येथे १, ज्योतीनगर १, संतानगर १, चिकलठाणा एमआयडीसी ४, हमालवाडा १, भूषणनगर १, एकतानगर १, भाग्यनगर १, एसआरपीएफ कॅम्प १, कटकट गेट १, उस्मानपुरा १, एन-१३ येथे १, न्यू उस्मानपुरा १, जिन्सी १, विद्युत कॉलनी १, अन्य ५२.

ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर ४, सिल्लोड १, नागापूर, ता. कन्नड १, नायगाव १, ममनापूर, ता. खुलताबाद १, कमलापूर १, कोहिनूर पार्क हाऊसिंग सोसायटी १, वडगाव कोल्हाटी १, पिसादेवी ४, सातारा गाव १, आवडे उंचेगाव, ता. पैठण १, खुलताबाद १, दुर्गानगर, वैजापूर २, कन्नड १, अन्य १८४.

Web Title: Corona Virus: Increase of 326 corona patients in Aurangabad district, 22 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.