Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ५६८ कोरोनाबाधितांची वाढ; ६०० रुग्णांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 12:06 PM2021-05-19T12:06:04+5:302021-05-19T12:11:13+5:30

Corona Virus : जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ३५ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २८ हजार ७४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Corona Virus: Increase of 568 Corona Viruses in Aurangabad District; discharge of 600 patients | Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ५६८ कोरोनाबाधितांची वाढ; ६०० रुग्णांना सुटी

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ५६८ कोरोनाबाधितांची वाढ; ६०० रुग्णांना सुटी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात उपचारादरम्यान २७ रुग्णांचा मृत्यू  सध्या जिल्ह्यात ६,३२६ रुग्णांवर सुरू उपचार आहेत 

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ५६८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६०० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले, तर गेल्या २४ तासांत २७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १८ आणि अन्य जिल्ह्यांतील ९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ६ हजार ३२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ३५ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २८ हजार ७४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,९६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ५६८ नव्या रुग्णांत शहरातील १७४, तर ग्रामीण भागामधील ३९४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १२८ आणि ग्रामीण भागातील ४७२ अशा ६०० रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना म्हाडा काॅलनीतील ३२ वर्षीय पुरुष, पैठण येथील ५० वर्षीय महिला, चित्तेपिंपळगाव येथील ६२ वर्षीय महिला, बिडकीन, पैठण येथील ५३ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर, सिल्लोड येथील ५५ वर्षीय पुरुष, पाचेलगाव, पैठण येथील ६० वर्षीय महिला, लाडगाव रोड, वैजापूर येथील ६० वर्षीय महिला, खोपेश्वर, गंगापूर येथील ४५ वर्षीय पुरुष, खंडाळा, वैजापूर येथील ६२ वर्षीय महिला, कन्नड येथील ६५ वर्षीय पुरुष, नाईकनगर, बीड बायपास येथील ५८ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ४५ वर्षीय महिला, ब्रीजवाडी, चिकलठाणा येथील ५४ वर्षीय महिला, पैठणखेडा येथील ४५ वर्षीय महिला, सांजखेडा येथील ५५ वर्षीय पुरुष, पिसादेवी रोड परिसरातील ७० वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील ६७ वर्षीय पुरुष, उपळा, कन्नड येथील ७६ वर्षीय पुरुष आणि बीड जिल्ह्यातील ६२ वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ४२ वर्षीय पुरुष, ५१ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, ४६ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष जालना जिल्ह्यातील ६६ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
सातारा परिसर ४, बीड बायपास ४, शिवाजीनगर ४, गारखेडा परिसर २, घाटी १, मिलिटरी हॉस्पिटल १, पेठेनगर १, श्रेयनगर १, मुकुंदवाडी ५, एन-४ येथे २, रामनगर १, देवळाई १, विशालनगर १, हर्सूल १, मुकुंदनगर १, जयभवानीनगर २, नंदनवन कॉलनी २, गुरुसहानीनगर १, न्यू हनुमाननगर १, भीमनगर भावसिंगपुरा २, शहानूरमियॉ दर्गा रोड १, दहीफळे कोविड सेंटर १, भवानीनगर १, भावसिंगपुरा १, बालाजीनगर ३, नारेगाव १, म्हाडा कॉलनी २, एन-६ येथे ३, एन-२ येथे २, टी.व्ही.सेंटर २, हिमायतबाग ३, एन-११ येथे ३, नाथनगर २, राधास्वामी कॉलनी ३, मयूरपार्क ३, सुरेवाडी ३, कांचनवाडी ३, द्वारकादासनगर २, एन-१ येथे १, रोशन गेट १, नागेश्वरवाडी १, एन-९ येथे ३, अयोध्यानगर १, एन-८ येथे १, एन-७ येथे ४, अलोकनगर ३, चेतनानगर १, ऊर्जानगर १, नाईकनगर १, नागसेननगर १, देवळाई चौक १, श्रेयनगर १, शक्तीनगर १, प्रतापनगर २, बेगमपुरा १, काल्डा कॉर्नर ३, पडेगाव २, शेषाद्री प्रिस्टिंग २, सुधाकरनगर १, खोकडपुरा १, माऊलीनगर १, एसआरपीएफ कॅम्प १, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर १, भक्तीनगर १, शहागंज २, राजनगर १, नंदनवन कॉलनी १, जुनाबाजार १, ईटखेडा १, वसंतनगर १, एन-१३ येथे १, अन्य ५४.

ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर ५, वडगाव कोल्हाटी २, तिसगाव १, सिडको वाळूज महानगर-१ येथे २, विटा, ता. कन्नड १, रामगड तांडा १, चितेपिंपळगाव १, सावंगी हर्सूल ३, खुलताबाद १, नागमठाण, ता. वैजापूर १, सिल्लोड १, चितेगाव १, मांडकी ३, दौलताबाद ३, रांजणगाव १, संजीवनी सोसायटी १, वडखा १, ग्रामीण १, पैठण २, करंजखेडा १, सालीवाडा ता. खुलताबाद १, अन्य ३५८.

Web Title: Corona Virus: Increase of 568 Corona Viruses in Aurangabad District; discharge of 600 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.