Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ९८ कोरोना रुग्णांची वाढ, ७ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 12:21 PM2021-06-21T12:21:35+5:302021-06-21T12:22:50+5:30
Corona virus : दिवसभरात उपचारानंतर ११६ जणांना सुटी
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या शंभराखाली आली. दिवसभरात अवघ्या ९८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरात २५, तर ग्रामीण भागातील ७३ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सात रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या एक हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४५ हजार ४७६ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४१ हजार ७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,३८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ३५ आणि ग्रामीण भागातील ८१, अशा ११६ रुग्णांना सुटी देण्यात आली.
उपचार सुरू असताना नक्षत्रवाडी येथील ७० वर्षीय महिला, माळीघोगरगाव, वैजापूर येथील ५५ वर्षीय महिला, वडाळा, पैठण येथील ७५ वर्षीय पुरुष, गोंदगाव, वैजापूर येथील ७० वर्षीय पुरुष, बाभुळतेल, वैजापूर येथील ५८ वर्षीय महिला, ज्ञानेश्वरनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, ऑडिटर सोसायटी, हर्सूल येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
संभाजी कॉलनी १, एन-५ येथे १, एन-६ येथे १, एन-१३ येथे १, आनंदनगर १, पुंडलिकनगर १, बीड बायपास १, कांचनवाडी १, एन-९ येथे १, एमजीएम होस्टेल १, एन-२ येथे १, छत्रपतीनगर, गारखेडा १, एन-४ येथे २, अन्य ११.
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर २, पैठण २, रांजणगाव शेणपुंजी १, अन्य ६८.