Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत मोठी घट; नीचांकी ५४ कोरोना रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 02:36 PM2021-06-22T14:36:26+5:302021-06-22T14:36:50+5:30
Corona Virus: जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४५ हजार ५३० एवढी झाली आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल चार महिन्यांनंतर सोमवारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील नीचांकी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली. दिवसभरात अवघ्या ५४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरात २०, तर ग्रामीण भागातील ३४ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ९९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील रुग्णसंख्येतही मोठी घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४५ हजार ५३० एवढी झाली आहे. आतापर्यंत एक लाख ४१ हजार १४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,३९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १९ आणि ग्रामीण भागातील ५५, अशा ७४ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना खुलताबाद येथील ६४ वर्षीय पुरुष, मुंडवाडी, कन्नड येथील ८० वर्षीय पुरुष, सिडको, एन-६, बजरंग चौक येथील ७७ वर्षीय महिला, शहाबाजार येथील ५७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
मुकुंदवाडी १, कांचनवाडी ३, जाधववाडी १, दिशा नगरी १, बीड बायपास २, स्वामी समर्थ केंद्र १, ब्रिजवाडी १, चिकलठाणा १, म्हाडा कॉलनी धूत हॉस्पिटल १, एन-१ येथे १,अन्य ७.
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर १, माहोरा, ता. कन्नड १, भीमशक्तीनगर, सातारा गाव १, रांजणगाव शेणपुंजी १, गंगापूर १, अन्य २९.