Corona Virus : चार महिन्यांनंतर सर्वांत कमी कोरोनाबाधितांची नोंद; जिल्ह्यात ९४ रुग्णांची भर, २२३ जणांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 12:38 PM2021-06-15T12:38:08+5:302021-06-15T12:39:46+5:30

शहारात २०, तर ग्रामीण भागात ७४ रुग्णांची भर पडली.

Corona Virus: lowest corona patient reported after four months; 94 patients added in the district, 223 people discharged | Corona Virus : चार महिन्यांनंतर सर्वांत कमी कोरोनाबाधितांची नोंद; जिल्ह्यात ९४ रुग्णांची भर, २२३ जणांना सुटी

Corona Virus : चार महिन्यांनंतर सर्वांत कमी कोरोनाबाधितांची नोंद; जिल्ह्यात ९४ रुग्णांची भर, २२३ जणांना सुटी

googlenewsNext
ठळक मुद्देउपचारादरम्यान ७ बाधितांचे मृत्यू सध्या जिल्ह्यात १५९३ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस कमी होत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे. चार महिन्यांनंतर सोमवारी सर्वांत कमी बाधितांची नोंद झाली. दिवसभरात केवळ ९४ रुग्ण आढळून आले, तर उपचार पूर्ण झाल्याने २२३ जण घरी परतले. सात बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिह्यात १,५९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहारात २०, तर ग्रामीण भागात ७४ रुग्णांची भर पडली. तर अनुक्रमे १४ व २०९ रुग्णांना सुटी झाली. आजपर्यंत १ लाख ४४ हजार ७८८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. आतापर्यंत १ लाख ३९ हजार ८४६ जण कोरोनामुक्त झाले असून एकूण ३,३४९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ग्रामीण मधील १,४४७, तर शहरातील केवळ १४६ अशा १,५९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीणमध्ये सर्वांत कमी सिल्लोड तालुक्यात केवळ १, तर सोयगाव तालुक्यात चार सक्रिय रुग्ण असून, सर्वाधिक वैजापूर तालुक्यात ४४४, औरंगाबाद तालुक्यात २८७, गंगापूर तालुक्यात २१८ रुग्ण असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 

मनपा हद्दीत २० रुग्ण
सातारा परिसर १, घाटी १, शकुंतलनगर १, चिकलठाणा १, एन-१ येथे १, मयूरपार्क १, नॅशनल कॉलनी १, रिलायन्स मॉलजवळ १, त्रिमूर्ती चौक १, अन्य ११.

ग्रामीण भागात ७४ रुग्ण
औरंगाबाद तालुक्यात २, फुलंब्रीत १, गंगापूर ५, कन्नड १७, खुलताबाद २, सिल्लोड २, वैजापूर १५, पैठण २७, तर सोयगाव तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.

सात बाधितांचे मृत्यू
घाटी रुग्णालयात चारनेर येथील ४२ वर्षीय पुरुष, तलवाडा येथील ७० वर्षीय महिला, कोऱ्हाळा तांडा येथील ७४ वर्षीय पुरुष, बिसमिल्ला काॅॅलनी येथील ५० वर्षीय पुरुष, लासूरगाव येथील ८२ वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात एन-२ सिडको येथील ५९ वर्षीय पुरुष, सराफारोड येथील ७१ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. म्युकरमायकोसिससह मधुमेह रक्तदाब लठ्ठपणा या सहविकृती असलेल्या भुसावळ येथील ५३ वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Corona Virus: lowest corona patient reported after four months; 94 patients added in the district, 223 people discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.