मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवसात १८३६ रुग्ण वाढले, पॉझिटिव्ह रेट १०. ७ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 11:58 AM2022-01-15T11:58:40+5:302022-01-15T12:03:35+5:30
Corona Virus: मराठवाड्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून एका दिवसात १ हजार ८२६ रुग्णांची नोंद झाली. विभागात औरंगाबाद, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. नांदेड जिल्ह्यात रुग्ण पॉझिटिव्ह रेट २४, तर औरंगाबादचा १६ टक्क्यांवर गेल्यामुळे प्रशासकीय पातळीवर सूक्ष्म नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंतची ही परिस्थिती होती.
मराठवाड्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. विभागात १ जानेवारीला ६६ रुग्ण होते. १४ व्या दिवशी रुग्णसंख्येचा आकडा तब्बल २ हजारांच्या दिशेने जात आहे. गुरुवारी दिवसभरात विभागात १७ हजार नागरिकांच्या चाचण्या झाल्या. त्यात १ हजार ८२६ रुग्ण समोर आले. यातून मराठवाड्याचा रुग्ण पॉझिटिव्ह रेट १०.७३ असल्याचे पुढे आले. मराठवाड्यात आजवर ओमायक्रॉनचे एकूण १९ रुग्ण आहेत. यात उस्मानाबाद जिल्ह्यात १०, औरंगाबाद ३, नांदेड ३, तर लातूर व जालना जिल्ह्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. यापैकी १५ रुग्णांवर उपचार करून ते घरी परतले आहेत, तर सध्या ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा-------एकूण चाचण्या------ रुग्ण -------------पॉझिटिव्ह रेट
नांदेड----------१६१८--------- ४००---------------- २४.७२टक्के
औरंगाबाद--- ३४१७ -------------५७३------------- १६.७७
लातूर--------- २७८४------- ४२१------------- १५.१२
जालना------- २२५७------------१६३---------------- ७.२२
उस्मानाबाद---- १९०३------- १४१----------- ७.४१
हिंगोली-------- ८७२---------- २७ --------------------३.१०
परभणी--------- २१३४----------५६---------------- २.६२
बीड---------- २०३३-------- ४५ -----------------२.२१
एकूण------------ १७०१८----- १८२६ -----------१०.७३