corona virus : इकडे लक्ष द्या ! विनामास्क फिरलात, तुमचे वाहन ब्लॅक लिस्ट तर झाले नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 05:07 PM2022-01-06T17:07:18+5:302022-01-06T17:11:50+5:30

corona virus in Aurangabad : ‘आरटीओ’कडून कारवाई करण्यात आली असून तब्बल १८७५ वाहने ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आली आहेत

corona virus : Pay attention here! Blacklist of 1875 driverless vehicles who are without mask | corona virus : इकडे लक्ष द्या ! विनामास्क फिरलात, तुमचे वाहन ब्लॅक लिस्ट तर झाले नाही ना?

corona virus : इकडे लक्ष द्या ! विनामास्क फिरलात, तुमचे वाहन ब्लॅक लिस्ट तर झाले नाही ना?

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात तुम्ही जर दुचाकी, चारचाकीतून विनामास्क फिरला असाल तर कदाचित तुमचे वाहन ब्लॅकलिस्ट झालेले असू शकते. कारण आरटीओ कार्यालयाने विनामास्क फिरणाऱ्या १८७५ चालकांचे वाहन ब्लॅकलिस्ट केले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून गेल्या काही दिवसांपासून शहरात विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांचे फोटो काढून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यात विनामास्क वाहनधारकांविरुद्ध महापालिकेच्या पथकाकडून फोटो काढण्यात येत आहेत. ते फोटो आरटीओ कार्यालयाच्या मेल आयडीवर पाठविले जात आहेत. त्यानंतर वाहनचालकांना ई-चालान पाठविण्यात येते. दंड भरला नाही तर या वाहनधारकांना टॅक्स, पीयूसी, इन्शुरन्स, फिटनेस करता येणार नाही.

एवढेच नव्हे तर वाहनमालकाला वाहन विक्री करता येणार नाही. ई-चालान पाठविण्यात आलेल्या वाहनधारकांनी आलेल्या दंडाची रक्कम त्वरित भरली तर त्यांचे वाहन ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून वाचू शकते. आतापर्यंत १८७५ वाहने ब्लॅक लिस्ट करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली.

 

Web Title: corona virus : Pay attention here! Blacklist of 1875 driverless vehicles who are without mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.