corona virus : ग्रामीणचे दिलासादायक चित्र, सक्रिय रुग्णांची ३४ गावे घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 07:26 PM2021-05-31T19:26:40+5:302021-05-31T19:28:24+5:30

corona virus :  पाॅझिटिव्हिटी रेट घटतोय, रुग्णसंख्या घटतेय, मृत्यूसत्र सुरूच

corona virus : Reassuring picture of rural, 34 villages of active patients decreased | corona virus : ग्रामीणचे दिलासादायक चित्र, सक्रिय रुग्णांची ३४ गावे घटली

corona virus : ग्रामीणचे दिलासादायक चित्र, सक्रिय रुग्णांची ३४ गावे घटली

googlenewsNext
ठळक मुद्दे१४९ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले१,२१९ गावे आतापर्यंत बाधित६१० गावांत सक्रिय रुग्ण६०९ गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर

औरंगाबाद : सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या सतरा दिवसांत १२ नव्या गावांत कोरोनाचे संक्रमण पोहोचले, तर सक्रिय रुग्ण असलेल्या गावांची संख्या ३४ ने कमी होऊन ६१० वर आली आहे. गेल्या दहा आठवड्यात ग्रामीण भागातील पाॅझिटिव्हिटी रेटमध्ये घसरण होत साप्ताहिक तपासणीचा पाॅझिटिव्हिटी दर ६ टक्क्यांकडे सरकतो आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सक्रिय रुग्णसंख्या २,८९६ झाली आहे. दोन दिवसांपासून बाधित रुग्णसंख्या दोनशेच्या आत आल्याने ग्रामीण भागातील चित्र दिलासादायक बनत असताना दोन अंकी मृत्यूसत्र सुरूच असल्याचे चिंता कायम आहे.

वैजापूरचा पाॅझिटिव्हिटी रेट सर्वाधिक असून, सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्याही याच तालुक्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे गंगापूर, औरंगाबाद, पैठणचा क्रमांक लागतो. गेल्या सात दिवसांत १,४१७ बाधितांची भर पडली. २,४५० बाधित बरे झाले. त्यांना सुटी देण्यात आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या २,८९६ झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संतोष कवडे यांच्या मार्गदर्शनात तालुका संपर्क अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या टीमसह, ग्रामदक्षता समित्यांचे सक्रिय काम, ग्रामीण भागात सुरू केलेले विलगीकरण केंद्र, शिक्षकांकडून गृह विलगीकरणातील रुग्णांची विचारपूस, ट्रेसिंग टेस्टिंगवर भर दिल्याने त्याचे परिमाण दिसू लागले आहेत. आता हळूहळू रुग्ण संख्या घटत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. उल्हास गंडाळ यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील कोरोना संक्रमणाचा उतरता आलेख
गावे - ३० मार्च -२५ एप्रिल -३ मे -१० मे-२७ मे
एकूण बाधित गावे -९२९ -१०९४ - ११५३ -१२०७ -१२१९
सक्रिय रुग्ण असलेली गावे - ४०२ -६३३ -६९५ -६४४-६१०
७ दिवसांपासून रुग्ण न आढळलेली गावे -१७६ -१३३ -१७१ -२०१-२३६
१४ दिवसांपासून रुग्ण न आढळलेली गावे -४८ -१३६ -१२२ -१८६-१९४
२८ दिवसांपासून रुग्ण न आढळलेली गावे -३०३ -१३३ -१६५ -१७६-१७९
२५ पेक्षा कमी सक्रिय रुग्ण असलेली गावे-८०७ -४५५ -४७६ -३९२-९३०
२५ ते ५० सक्रीय रुग्ण असलेली गावे -६९ -९९ -१२१ -१२४-१५५
५० ते १०० सक्रिय रुग्ण असलेली गावे -२८ -४३ -५६ -८०-८६
१०० पेक्षा अधिक रुग्ण असलेली गावे -२५ - ३६ -४२ -४८-४८

तालुका : सक्रिय रुग्ण -पाॅझिटिव्हिटी दर
औरंगाबाद -६०३-१६.१
फुलंब्री - ९५-८.७
गंगापूर -३८९-१८.१
कन्नड -४०७-१५.२
खुलताबाद-९१-९.५
सिल्लोड-११०-१२.९
वैजापूर -७८९-२०.०
पैठण - ३८४-१५.९
सोयगांव -२५-१३.७


साप्ताहिक तपासण्यांचा दहा आठवड्यांचा पाॅझिटिव्हिटी रेट
आठवडा -पाॅझिटिव्हिटी रेट
२२ ते २८ मार्च -२६.०
२९ मार्च ते ४ एप्रिल -२४.१
५ ते ११ एप्रिल -२१.३
१२ ते १८ एप्रिल २४.२
१९ ते २५ एप्रिल -२२.०
२४ एप्रिल ते २ मे -१६.५४
३ ते ९ मे -१४.२
१० ते १६ मे -११.८
१७ ते २३ मे -९.९
२४ ते २६ मे -६

दिनांक - बाधित रुग्ण : डिस्चार्ज रुग्ण
२४ मे -२०५-३८६
२५ मे -२४४-४५४
२६ मे -२१९-२४२
२७ मे -२०१-३३८
२८ मे -२२४-३५७
२९ मे -१५७-३३०
३० मे -१६७-३४३

Web Title: corona virus : Reassuring picture of rural, 34 villages of active patients decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.