corona virus: तिसरी लाट वेगात, जिल्ह्यात कोरोनाचे त्रिशतक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 03:28 PM2022-01-11T15:28:21+5:302022-01-11T15:30:42+5:30
corona virus: आतापर्यंत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अकराशेवर गेली आहे
औरंगाबाद : कोरोनाच्या (corona virus in Aurangabad ) तिसऱ्या लाटेचा वेग झपाट्याने वाढत असून, सोमवारी नव्या रुग्णांची संख्या तीनशेपार गेली. दिवसभरात ३१७ नव्या रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील सर्वाधिक २७६ आणि ग्रामीण भागातील ४१ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सोमवारी ३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात शहरातील २८ आणि ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार ३८४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात सध्या १,१४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रविवारी नव्या रुग्णांची संख्या दोनशेपार गेली होती. एकाच दिवसानंतर सोमवारी रुग्णसंख्येने तीनशेचा आकडा पार केला. यामध्ये शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाल्याची परिस्थिती आहे. शहरातील प्रत्येक भागात कोरोनाने हातपाय पसरल्याने चिंता व्यक्त होत आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण
ऑरेंज सिटी १, मिलेनियम पार्क १, सदाशिवनगर १, शिवाजीनगर ४, एन - तीन येथे ३, बीड बायपास ४, कासलीवाल तारांगण १, सातारा परिसर १, गारखेडा २, एन - चार येथे ५, उल्कानगरी २, सिडको १, हनुमाननगर १, चार्लानगर १, राजनगर १, बसैयेनगर १, संजयनगर १, एन-दोन येथे २, म्हाडा कॉलनी २, पैठण रोड १, औरंगपुरा १, इटखेडा १, बन्सीलालनगर ३, समर्थनगर २, वेदांतनगर ३, पडेगाव ६, राजाबाजार १, उस्मानपुरा २, रेल्वे स्टेशन १, अहिंसानगर १, टाऊन सेंटर १, भानुदासनगर १, विद्यानिकेतन कॉलनी १, कांचनवाडी १, देवानगरी १, रामनगर १, भोईवाडा १, नवाबपुरा १, हनुमाननगर १, पदमपुरा २, वेदांतनगर १, पैठण रोड १, श्रेयनगर १, मयुर पार्क १, भगतसिंगनगर १, बेगमपुरा १, अन्य २०२.
ग्रामीण भागांतील रुग्ण
औरंगाबाद १२, फुलंब्री १, गंगापूर ११, कन्नड ३, खुलताबाद १, वैजापूर ५, पैठण ८.